• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

बिलवाडी खून प्रकरण : संशयितांच्या घरात वस्तूंची नासधूस करून दुचाकी जाळली, कारच्या काचा फोडल्या ! 

जळगावात सकाळी रस्ता रोको, जिल्हाधिकारी, एसपींना निवेदन ;मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, एसपी यांची गावात भेट 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 15, 2025
in Uncategorized
बिलवाडी खून प्रकरण : संशयितांच्या घरात वस्तूंची नासधूस करून दुचाकी जाळली, कारच्या काचा फोडल्या ! 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव  : तालुक्यातील बिलवाडी या गावामध्ये काल रविवारी दि. १४ रोजी सकाळी २ कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्या वादातून हाणामारी होऊन एका ५५ वर्षीय इसमाचा खून करण्यात आला होता. तर ११ जण जखमी झाले. सोमवारी सकाळी मृतदेह ताब्यात न घेता गोपाळ कुटुंबीय व ग्रामस्थांनी सुरुवातीला आकाशवाणी चौकात चक्का जाम केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करून नंतर जिल्हाधिकारी व पुढे एसपी कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. त्यानंतर गावात अंत्यविधी सुरु असताना मात्र दुसरीकडे संशयित आरोपींच्या घराच्या अंगणात दुचाकीची जाळपोळ करून वस्तूंची नासधूस करण्यात आली. त्यामुळे बिलवाडी गावात तणावपूर्ण शांतता आहे.

 

या घटनेमध्ये मयत पावलेले एकनाथ गोपाळ यांचा मृतदेह जोपर्यंत सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही शव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. सकाळच्या सुमारास गोपाळ कुटुंबातील सर्व नातेवाईक व ग्रामस्थांनी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकामध्ये महामार्गावर रास्ता रोको केला.(केसीएन)त्या रास्ता रोकोनंतर त्यांनी पायीच मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व तेथे निवेदन दिल्यावर ते पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व अंत्यसंस्कारासाठी सर्व कुटुंबीय गावामध्ये आले. बिलवाडी गावात आल्यानंतर एकीकडे अंत्यसंस्कार सुरू असताना दुसऱ्या बाजूला काही लोकांनी या घटनेतील जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हल्ला केला.

 

या हल्ल्यात त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी जाळपोळ झाली. यामध्ये फ्रिज, दुचाकी तसेच डाळी असलेल्या सर्व फेकून नासधूस केली. गावामध्ये एका ठिकाणी एका चारचाकीची तोडफोड झाली आहे. एका घरावर जाळपोळीचा प्रयत्न झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी आले.(केसीएन)कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्णतः दक्षता घेतली आहे. आता या ठिकाणी सर्वत्र शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात करण्यात आलेला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. दोन संशयित अद्याप फरार असून त्यांचाही शोध घेणे चालू आहे.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

डॉ. नीलेश चांडक यांचे कार्य प्रशंसनीय : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर 

Next Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif