नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त १६ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी ९.३० ते १२.३० या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एम. जे कॉलेज परिसरातील कान्ह कला मंदिर मनभावन संकुल येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, विशेष अतिथी म्हणून कबचौउमविचे प्र. कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, मागदर्शक म्हणून केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे तर अध्यक्षस्थानी केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश पाटील यांनी माहिती दिली.
संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारी चित्रफीत
या कार्यक्रम सोहळ्यात संस्थेच्या कार्याचा आणि वाटचालीचा परिचय देणारी चित्रफित सादर करण्यात येणार असून त्यातून संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची झलक पाहायला मिळणार आहे. वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त संस्थेच्या सर्व शाळेतील विद्यार्थी विविध कलाप्रकारात सहभाग नोंदविणार आहेत. सन १९४४ मध्ये स्थापन झालेली केसीई सोसायटी महाराष्ट्रातील नामांकित संस्था आहे.गेल्या आठ दशकापासून गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि सर्वागिण विकासाला चालना देण्याच्या ध्येयावर संस्था ठाम आहे.
विविध शैक्षणिक उपक्रम व अभ्यासक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार केसीई सोसायटी आता अभियांत्रिकी व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली, भारतीय संगीत, योग विज्ञान यासारख्या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेट स्तरावर अनेक व्यवसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याचे ऍड प्रकाश पाटील यांनी सांगितले. पत्रपरिषदेला शैक्षणिक संचालिका प्रा. मृणालिनी फडणवीस, प्राचार्य संजय भारंबे, शशिकांत वडोदकर, डी.टी. पाटील आदी उपस्थित होते.







