नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी तर्फे आयोजित २४ वा जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव २०२५ जल्लोषात संपन्न झाला. यावेळी ६ ते ७५ वयोगटातील तब्बल ६३ संघांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला. त्यापैकी जळगाव शहरातील ४३ तर ग्रामीण भागातील २० संघांचा समावेश होता.
भुलाबाईच्या पारंपरिक गाण्यांचा – “देवराय राणी रुसून बसली कैशी”, “भुलोजी आला माहेरवाशीण घेऊन”, “आई भवानीच्या सवे पाऊले टाकू या गावा” – अशा ओव्यांपासून ते “ऑपरेशन सिंदूर”, “गड-किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश” यांसारख्या सामाजिक संदेशपर सादरीकरणांपर्यंत रंगतदार कार्यक्रमांनी महोत्सव दुमदुमला.महोत्सवाचे उद्घाटन बालरोग तज्ज्ञ डॉ. इंद्राणी मिश्रा यांच्या हस्ते झाले.
आजच्या मॉडर्न युगासोबत आपली संस्कृती जपण्याचे गरजेचे – डॉ इंद्रायणी मिश्रा
आजच्या मॉडर्न युगासोबत आपली संस्कृती जपण्याचे गरजेचे आहे. आपल्या भाषणात त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करून महिलांसाठी त्या दीपस्तंभ . असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ इंद्रायणी मिश्रा तसेच जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पत्नी यांनी केले त्या केशवस्मृती प्रतिष्ठान आयोजित भुलाबाई महोत्सव 2025 च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून टीजेसबी बँकेच्या संचालिका डॉ. अश्विनी बापट उपस्थित होत्या. त्यांनी महिलांचे स्वावलंबन वाढीस लागले असून, भुलाबाई महोत्सव हा स्त्री सक्षमीकरणाचे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले.
बक्षीस वितरण समारंभास केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड, ललित कला संवर्धिनीचे प्रमुख संजय हांडे, महोत्सव प्रमुख देवयानी कोल्हे, वैशाली कोळंबे, रेखा कुळकर्णी उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंजली हांडे तर समारोप कार्यक्रमाचे संचालन सोनिका मुजुमदार यांनी केले. आभार प्रदर्शन मनिषा खडके यांनी केले.
*परीक्षक मंडळ*
लहान गट : नुपूर खटावकर, नेहा रडे,मोठा गट : मानसी जोशी, नुपूर खटावकर, खुला गट : डॉ. सोनाली महाजन, डॉ. सुषमा खानापूरकर
*सूत्रसंचालन*
लहान गट : स्वराली येवले, चेतना वाघ,मोठा गट : शामली शिंपी, लोचना लिंगायत,खुला गट : ऋतुजा संत, सोनिका मुजुमदार
*विजेत्यांचा निकाल*
🔹 लहान गट (शहरी)
प्रथम – संस्कृती परंपरा गट
द्वितीय – विद्याविकास इंग्लिश स्कुल, जळगाव
तृतीय – मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगाव
उत्तेजनार्थ – रोझलॅड प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव, सृजन बालिका गट
🔹 लहान गट (ग्रामीण)
प्रथम – भैरवी गृप, चाळीसगाव
द्वितीय – श्री समर्थ विद्या मंदिर, आव्हाने
तृतीय – शांती विद्या मंदिर, फैजपूर
उत्तेजनार्थ – तू. स. झोपे गुरुजी स्कुल, भुसावळ
🔹 मोठा गट (शहरी)
प्रथम – अनुभूती शाळा, जळगाव
द्वितीय – ओरियन रायझिंग शाळा, जळगाव
तृतीय – प.न. लुंकड कन्या शाळा, जळगाव
उत्तेजनार्थ –ब. गो. शानबाग विद्यालय, जळगाव
बी. यु. एन. रायसोनी विद्यालय, जळगाव
🔹 मोठा गट (ग्रामीण)
प्रथम – प्रताप विद्यालय
द्वितीय – न्यू इंग्लिश स्कुल, जामनेर
तृतीय – न्यू वर्ल्ड स्कुल, भुसावळ
उत्तेजनार्थ – काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय, चाळीसगाव
चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, भुसावळ, चोपडा आणि रावेर अशा तालुकास्तरीय फेऱ्यांतील विजयी संघांनी जिल्हास्तरीय महोत्सवात सहभाग नोंदवला.
“भुलाबाई महोत्सव हा केवळ सांस्कृतिक सोहळा नसून महिला सबलीकरण, लोकपरंपरेचे जतन आणि समाजभान वाढविणारा उत्सव आहे. भुलाबाईच्या ओव्या व नृत्यांच्या माध्यमातून मातृशक्तीची एकात्मता प्रकट होते,” असे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भुलाबाई महोत्सव समितीच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.







