पुरस्कार धनादेशाची रक्कम क्षयरोगग्रस्तांना देणाऱ्या प्रा. मोरेंना प्रजापिता ब्रह्माकुमारी दीदींनी बांधली राखी.
फैजपुर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालय येथे कार्यक्रम झाला संपन्न
नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
फैजपुर – येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालय येथे आज शकुंतला दिदी यांनी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भाजपा अनुजाती मोर्चा राज्य सचिव प्रा. संजय मोरे यांच्या सह मुंबई येथील सेवानिवृत्त न्यायाधीश दयाराम आनंदा कोळी यांच्या पत्नी मंगला कोळी यांचे राखी बांधुन केले औक्षण करण्यात आले .
भाजपा अनु जाती मोर्चा राज्य सचिव प्रा.संजय मोरे यांना कर्नाल हरियाणा राज्यात नुकताच संपुर्ण भारत देशातुन ९वा क्रमांक तर महाराष्ट्र राज्यातुन एकमेव असा राष्ट्ररत्न पुरस्कार मिळाल्या बदल प्रजापती ब्रह्माकुमारी विद्यालय तर्फे शकुंतला दिदी ज्ञानदेव ज्ञानदेव भाई चौधरी मीरा दिदी तर्फे लक्ष्मी नारायण प्रतिमा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. संजय मोरे यांना सत्यमेव जयते स्मृती चिन्ह असलेली ट्रॉफी तिरंगा फेटा आणि ५१००० रु.चा धनादेश देण्यात येऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला,सिने अभिनेत्री मंदाकिनी, मिनाक्षी शेषाद्री,अँटी करप्शन फाउंडेशनचे सुप्रीमो डॉ.नरेंद्र अरोरा,राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रणज्योत सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे, प्रा. संजय मोरे यांनी मिळालेला पुरस्कारा समवेत ₹५१,०००/- चा धनादेश देशातील क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी अँटी करप्शन फाउंडेशनला डॉ . नरेंद्र अरोरा यांच्या कडे सुपूर्द करत एक समाजाभिमुख आदर्श प्रस्थापित केला.या कार्यक्रमाला दिपक तायडे संजय धनगर पो.कॉ.अनिल तायडे राजेंद्र साळुंके ईत्यादि उपस्थित होते.






