नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क by योगेश सुने -बारी
जळगाव : भक्ती आणि श्रद्धेच्या वातावरणात सद्गुरू श्री मोरेश्वर महाराजांचा जन्मोत्सव यंदाही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तेली चौक येथील श्री अवधूत भजन मंडळ येथे हा सोहळा होणार आहे.
दिनांक ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते ५ या वेळेत श्री पंत गुरुचरित्र पोथी पारायण होणार आहे.
९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजता प्रेम ध्वजारोहण होईल. त्यानंतर रात्री ९ पासून अखंड भजन सेवा सुरू होऊन १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ पर्यंत सुरू राहील. त्यात जन्मोत्सव, पाळणा, आरती, धावा, पुष्पांजली व द्रष्ट काढणे असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत
कार्यक्रमानंतर महाप्रसाद (भंडारा) ठेवण्यात आला असून हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन त्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरूंच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अवधूत भजन मंडळ, तेली चौक जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.







