नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव : मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व सव्वा महिन्याच्या उपवासाची सांगता आज (दि. 2 सप्टेंबर 2025) रोजी भक्तीभावाने करण्यात आली. या निमित्ताने गुरुनानक नगरातील ममूराबाद रस्त्यावरील हनुमानजी मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भंडारा सुरू करण्यापूर्वी श्रीरामदेवबाबांची आरती दुपारी 12 वाजता मोठ्या श्रद्धाभावाने संपन्न झाली. ही आरती शिवचरणभैय्या ढंडोरे, पोलिस निरीक्षक शनिपेठ कावेरी कमलाकर व पोलिस कर्मचारी योगेश साळवे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर समाजबांधवांच्या उपस्थितीत भंडाऱ्याला प्रारंभ झाला.
या प्रसंगी प्रेम पवार, कन्हैया जाधव, नंदलाल गोडाले, राजेश चावरिया, राम भैया पवार, पवन जाधव, कुणाल पवार, राहुल पवार, वीनू पवार, अॅड. विशाल रील, शुभम पवार, अजय अटवाल, सोनू चिरावंडे आदी मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.







