नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्कby योगेश सुने
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर संपुष्टात आले. शासनाने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील पाणी पाजून जरांगे पाटील उपोषण सोडले यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, शिवेंद्र राजे भोसले यांची उपस्थिती होती.
मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर 
सरकारकडून याबाबतचा जीआर काढण्यात आल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडताच त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मनोज जरांगे यांच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील आरक्षण लढ्याला नवा टप्पा प्राप्त झाला असून, शासन आणि समाज यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे.
“संपूर्ण मराठा समाजाचं कल्याण झालं” – मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणासाठी घेतलेले उपोषण संपुष्टात आणल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. “माझ्या उपोषणामुळे संपूर्ण मराठा समाजाचं कल्याण झालं,” संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने समाजात समाधान व दिलासा व्यक्त केला जात आहे.
🔹 ओबीसी समाजाची भूमिका :
मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये, अशी भूमिका.आरक्षण ढासळू नये” यावर ठाम भूमिकेची तयारी.ओबीसी नेते सक्रिय; संघटनांमध्ये चर्चा सुरू.
या आंदोलनातून असे दिसून येते की जर सामान्य माणसाने ठरवले आणि त्याचा हेतू प्रामाणिक असेल तर समाज त्याच्या पाठीशी कधीही उभा असतो व तो त्याचा हेतू साध्य करू शकतो असं जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊन सिद्ध करून दाखवलं आहे.







