राजस्तरीय कॉर्फबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड चाचणी संपन्न
नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क by योगेश सुने.
जळगाव: येथील जळगाव जिल्हा कॉर्फबॉल असोसिएशन तर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर कॉर्फबॉल खेळाची निवड चाचणी घेण्यात आली.सदर निवड चाचणीतून निवड झालेला संघ मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॉर्फबॉल स्पर्धेत सहभागी होईल असे संघटनेचे सचिव प्रा. जितेंद्र पाटील यांनी कळविले आहे.
सदर संघ पुरुष आणि महिला असा समिश्र असून निवड झालेला संघात देवेश्री महाजन, मनीषा हटकर,पूर्वा हटकर, अंकिता बिडकर,यश सोनवणे, दया पाटील, शुभम राणे, उदय मुनोत, अहद खान,भूमेश बऱ्हाटे,हर्षल राजवाणी. या खेळाडूंची निवड करण्यात आली.
तसेच निवड झालेल्या खेळाडूचे संघटनेचे अध्यक्ष आ. सुरेश भोळे, कार्याध्यक्ष डॉ. पी. आर. चौधरी, सहसचिव डॉ. अमोल पाटील, यांनी अभिनंदन केले आहे.खेळाडूना जितेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.







