श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये गणपती निमित्त अथर्वशीर्ष पठण
नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयां मध्ये आज श्री स्वामी समर्थ केंद्र रामेश्वर कॉलनी यांच्या तर्फे गणपती उत्सवा निमित्त सेवेकरी सोनल राठोड ,वैष्णवी नालकोल यांच्या श्रीमुखातुन अथर्वशीर्ष पठण चे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि बुद्धिमत्तेच्या विकासासाठी एक उत्तम परंपरा आहे. हे पठण मुलांना एकाग्रता वाढवण्यास, एकात्मता जपण्यास आणि गणेशाच्या दिव्य गुणांची जाणीव करून देण्यास मदत करते. विद्यार्थ्यांना सामूहिकरित्या प्रार्थना करण्याचा आणि परंपरेचा भाग बनण्याचा अनुभव मिळावा.
याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी उपशिक्षिका शितल कोळी ,कविता सानप, उज्वला नन्नवरे, सरला पाटील , साधना शिरसाट, शारदा तडवी, सुवर्णा पाटील, दिनेश पाटील सर आदींनी परिश्रम घेतले.







