नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत नवं प्रवेशित प्रथम वर्ष व्यवस्थापन व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे ‘दीक्षारंभ ‘ या संकल्पनेतून इंडक्शन प्रोग्रॅम ला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुहास गाजरे ,प्रमुख वक्ते .गनी मेमन ,के सी ई संस्थेचे शैक्षणिक संचालिका व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ . मृणालिनी फडणवीस ,के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले
. दि. २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झालेल्या कार्यक्रमात हसत खेळत शिकूया विज्ञान ,विद्यार्थ्यांची औद्योगिक व शैक्षणिक भेट विविध मनोरंजनाचे ,खेळाचे ,अँटी रॅगिंग ,योगसाधना इ प्रकारचे आयोजन केले आहेत . कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी महाविद्यालयांत सुरु असलेले पायाभूत सुविधा ,उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, दीक्षारंभ ‘ या शब्दाचा अर्थ ,शैक्षणिक मूल्यमापन ,कौशल्य विकास शिक्षण या बद्दल माहिती दिली .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ सुहास गाजरे यांनी त्याच्या भाषणातून रॉकेट बॉईज वेब सिरीज चा आदर्श सांगितला . तसेच एआय च्या संकल्पनेतून निर्माण झालेले ड्रीम या शब्दाचा अर्थ धाडस ,चिवटपणा ,नवनिर्मिती ,प्रेरणा ,आकांशा या पंचसुत्रीचा अवलंब करण्यास सांगितले . मी कोण आहेत ? मी काय करू शकतो ? मी कशाकरिता आहेत ? तसेच ध्येय ,वेग ,कौशल्य ,संशोधन इ मार्गाने यश मिळू शकते असे प्रतिपादन डॉ . मृणालिनी फडणवीस यांनी केले . जीवनाचे यश अपयश फक्त पैश्याच्या स्वरूपात खरेदी न करता मेहनत करून अतिशय आनंदाने जीवन जगा . आई वडिलांना केलेल्या कामाची पावती न मागता त्याची सेवा करा प्रत्येक दिवस आणि क्षण किती आनंदाने जगत आहेत या दृष्टीकोनातून आयुष्य जगा . आई वडिलांना विसरू नका . नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु करा . असे प्रेरणादायी व्याख्याते गनी मेमन यांनी उपस्थतित विद्यार्थी ,पालकवर्ग याना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाला म्युझिक क्लब चे विद्यार्थ्यांनी सहकार्य केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा . स्नेहा पाटील व प्रा रुची गुल्हाने यांनी केले . कार्यक्रमाला अकॅडमिक डीन प्रा . राहुलकुमार पटेल ,ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा .गणेश पाटील ,आयक्यूएसी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन , पॉलीटेकनिक चे समन्वयक प्रा बी जे लाठी , प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा किरण पाटील ,व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख प्रा श्रुतिका घरडे ,प्रा शेफाली अग्रवाल , प्रा डिगंबर सोनवणे ,प्रा वीणा भोसले ,प्रा हर्षा देशमुख , प्रा हेमंत धनधरे ,प्रा रेवती पाटील , प्रा तान्या भाटिया ,प्रा सचिन नाथ ,प्रा प्रवीण भंगाळे ,प्रा डॉ प्रसाद कुलकर्णी ,प्रा समाधान खैरे , प्रा अविनाश सूर्यवंशी, प्राध्यापक वृंद ,विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थतीत होते .







