• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन

ढोल-ताशांच्या गजर : आकर्षक सजावट विद्यार्थ्यांचा जल्लोष.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 29, 2025
in आरोग्य, जळगाव, शैक्षणिक
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क  – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रांगणात श्रींचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. गणरायाचा आगमन सोहळा ढोल-ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाप्पाच्या आगमनासाठी आकर्षक सजावट केली होती. यावेळी डॉ. वैभव फरके यांच्या हस्ते गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. सी.डी. सारंग यांच्यासह महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना

जळगाव – डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी बाप्पाचे उत्साहात स्वागत केले. संपूर्ण परिसरात रंगीबेरंगी सजावट, फुलांची आरास आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे आनंददायी वातावरण निर्माण झाले. प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर व प्रशासन विभागातील राहुल गिरी यांच्या हस्ते करण्यात आली.

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय

जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, येथे सवाद्य गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सपत्नीक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व वैद्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री गणेश स्थापना

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री गणेश स्थापना सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडी मिरवणूक काढली. महाविद्यालयाचा परिसर भक्ती, संस्कृती व परंपरेच्या रंगांनी दुमदुमून गेला.या वर्षी विद्यार्थ्यांनी इको-फ्रेंडली संकल्पना जोपासत टाकाऊ साहित्यापासून आकर्षक किल्ला सजावट केली आहे. पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारी ही सजावट विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. सुमित व सोनाली निर्मल यांच्या हस्ते श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी प्राचार्य, सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व साम्राज्य बॅचचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—-

बातमी शेअर करा !
Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये गणपती निमित्त अथर्वशीर्ष पठण

Next Post

लकी टेलर अनलकी ; सभापती पदाने पुन्हा दिली हुलकावणी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
लकी टेलर अनलकी ; सभापती पदाने पुन्हा दिली हुलकावणी

लकी टेलर अनलकी ; सभापती पदाने पुन्हा दिली हुलकावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif