-
योग संशोधनातून पीएच.डी. पदवी — प्रा. श्रद्धा व्यास यांचा गौरव
जळगाव– के. सी. ई. सोसायटी संचालित एम. जे. कॉलेज, जळगावच्या सोहम योग विभागामध्ये कार्यरत असलेल्या प्रा. श्रद्धा व्यास यांनी निर्वाण युनिव्हर्सिटी, जयपूर येथून योग विषयातील पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी “Effect of Pranayama on Mental Health and Emotional Intelligence of Adolescents” या विषयावर सखोल संशोधन केले असून हे कार्य डॉ. नितीन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.
या संशोधन प्रवासात सोहम योग विभागप्रमुख डॉ. देवानंद सोनार, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. ज्योती वाघ तसेच ओरियान सीबीएसई स्कूलच्या प्राचार्य सुषमा कंची यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. श्रद्धा व्यास या आनंद व्यास व जयश्री व्यास यांची कन्या असून त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले
या उल्लेखनीय यशाबद्दल के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे व शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणविस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व मित्रपरिवार यांच्याकडूनही त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.







