आव्हाने शिवार, जळगाव – श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, आव्हाने शिवार येथे पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यालयात खास सजविण्यात आलेल्या राजा सर्जा या बैलजोडीचे औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी व उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. मुलांनी पारंपरिक पोशाख घालून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गाणी सादर केली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोज पाटील सर व संचालक श्री. रामराजे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पोळा सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.या अनोख्या उपक्रमामुळे विद्यालयात पारंपरिक सणांचा उत्साह, शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व संस्कृती जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सौ.हर्षाली पाटील,मुख्याध्यापिकासौ.मंजुषा सोनवणे व मुख्याध्यापिका श्रीमती.वैशाली शिंदे उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना या सणाचा सांस्कृतिक वारसा समजून घेण्याची संधी मिळाली.
सूत्रसंचलन व आभार सारिका इंगळे यांनी मानले.







