जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी बैलाला सजवत केली दैवताची पूजा बैलांचे महत्त्व सांगून बैलपोळा साजरा करण्याचा उद्देश यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.
आपल्या संस्कृती, सण यांचा वारसा, महत्त्व आजच्या शहरी भागामधील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या दृष्टीकोनातून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे बैल पोळा साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांचे दैवत म्हणजे बैल. शेतकऱ्यांच्या या दैवताची पूजा ग्रामीण भागात बैल पोळा या सणाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने शेतकरी साजरा करण्यात आली. शहरी भागात बैलपोळा सण दुर्मिळ आहे विद्यालयात शिक्षक व विद्यार्थी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या कल्पकतेतून दरवर्षी बैलपोळा साजरा केला जातो.







