वर्ल्ड इंग्लिश मेडीयम स्कुल अमोदे खु येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात
जळगाव प्रतिनिधी येथील वर्ल्ड इंग्लिश मेडीयम स्कुल अमोदे खु येथे १९व्या स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व भारतमातेचे प्रतिमापूजन शाळेच्या मुख्याध्यापक . पुजा आसोदेकर यांनी ध्वजारोहण केले.
या कार्यक्रमाप्रसंगी लहान मोठ्या सर्व बालकलाकारांनी विविध वेशभूषा करून देशभक्तीपर गीते सादर केले. व अनुत्ती नेते हिने भारतमातेची वेशभुषा सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा पाटिल यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पुजा आसोदेकर शिक्षक वृंद . स्वाती मोहडकर, राणी चावरीया, अर्चना सांळूखे, नेहा सपकाळे, सुवर्णा घोडके, वैशाली इंगळे, दिव्या मॅडम तसेच कर्मचारी वृंद किशोर सोनवणे यांचे सहकार्य लाभले.






