दहीहंडीतील जखमी गोविंदावर मोफत उपचार करतात डॉ अवधूत चौधरी
स्व.डॉ नामदेव चौधरी ७७ वर्षाची उपचाराची परंपरा डॉ अवधूत चौधरी कडून कायम.
जळगाव प्रतिनिधी : ७७ वर्षापूर्वी सुवर्ण नगरीतील गोविंदाना डॉ नामदेव मोनू चौधरी यांनी.जुना जळगाव शेतमजुर,गोर गरीबांच्या वर अत्यत माफक दरात सांधा ,निखळ ,हात व पाय मुरघळणे फॅक्चर होणे यावर उपचार करीत होते. तमेच दहीहंडी फोडनाऱ्या प्रयत्नात जखमी झालेल्या गोविंदा व सहकाऱ्यांवर वर मोफत उपचार करीत होते. तीच परंपरा त्यांचे सुपुत्र डॉ. अवधुत चौधरी यांनी पुढे सुरू ठेवली आहे.
जळगाव शहरात दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी होणाऱ्या गोविंदावर मोफत उपचार निरंतर करण्यात येत आहे. या सह कबड्डी,कुस्ती, तसेच क्रिकेट खेळात जे युवक जख्मी होतात त्यांच्यावर देखील मोफत उपचार केला जातो. डॉ. अवधुत चौधरी यांनी सातपुड्यातील जंगलातून वनस्पती शोधून त्याचा लेप बनवून उपचार करीत आहे. त्यासाठी त्यांचे बंधू संजय चौधरी मुलगा डॉ नितेश व डॉ स्वप्निल हे देखील त्यांना मदत करीत असतात. वडीलांनी दिलेला सेवाव्रत आजही निरंतरपणे जपत आहे. त्यामुळे अनेकांच्या वेदनावर फुंकर घालण्याचे भाग्य लाभल्याने ते समाधान व्यक्त करीत आहे.
त्याबरोबर या वर्षापासुन परिसरातील गोर गरीब शालेय विद्यार्थांना मोफत वह्या व शालय वस्तु पुरवत आहेत.







