• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home सनउत्सव उपक्रम

सागर पार्कवर होणार युवतींची भव्य दहीहंडी

तरूणींच्या मनोर-यासाठी स्वतंत्र व्यवस्था; पुणेरी ढोल-ताशाच्या गजर घुमणार.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 14, 2025
in सनउत्सव उपक्रम, जळगाव
सागर पार्कवर होणार युवतींची भव्य दहीहंडी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

सागर पार्कवर युवतींची भव्य दहीहंडी

भव्य व्यासपिठ;

तरूणींच्या मनोर-यासाठी स्वतंत्र व्यवस्था;

पुणेरी ढोल-ताशाच्या गजर घुमणार

जळगाव दि. १४ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) वर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघात ७० ते ८० गोपिका असून एकूण ५०० युवती गोविंदांनी कसून सराव सुरू केला आहे. यंदा ५ थरांपर्यंत सराव करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. या उत्सवासाठी संघाची तयार अंतिम टप्प्यात आली आहे.

 

पुणेरी ढोल-ताशाच्या गजर घुमणार…

 

गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब, सांस्कृतिक नृत्य आदी. प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. तसेच शौर्यवीर, पेशवा, वज्रनाद या ढोलपथकाचे ४१२ वादक पुणेरी ढोल-ताशाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी संख्या नागरिक नागरिक सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.

 

उत्सवासाठी ही आहेत गोपिकांची अकरा पथके

 

गोपिंकांची दहीहंडी फोडण्यासाठी यंदा प्रथमच अकरा युवतींचे पथके येणार आहेत. या पथकामध्ये किडस् गुरूकुल शाळा, नुतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲड एस. ए. बाहेती महाविद्यालय, के.सी.ई. सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टीट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा, एन.सी.सी. या पथकांचा समावेश आहे.

 

यांची असेल प्रमुख उपस्थिती

खासदार अॅड. उज्वल निकम,खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. इंद्राणी मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

केसीइतॲक्युप्रेशर क्रॅश कोर्स यशस्वीपणे संपन्न

Next Post

दहीहंडीतील जखमी गोविंदावर मोफत उपचार.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दहीहंडीतील जखमी गोविंदावर मोफत उपचार.

दहीहंडीतील जखमी गोविंदावर मोफत उपचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif