श्री समर्थ विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
जळगाव–आव्हाने शिवार श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, आव्हाने शिवार, जळगाव येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील सर व संचालक. रामराजे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करून शुभेच्छा दिल्या.रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त विद्यार्थ्यांनी भावंडांमधील प्रेम, जिव्हाळा व नात्यांची गोडी व्यक्त केली.
विद्यार्थिनींनी भावांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली तर भावांनीही बहिणींच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. संपूर्ण विद्यालय परिसर भावनिक आणि आनंददायी वातावरणाने भारून गेला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली शिंदे व मुख्याध्यापिका मंजुषा सोनवणे उपस्थित होते. शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न झाला.







