इको क्लब तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये शाश्वत शेती दिन’ साजरा
जळगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालयात हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त, राज्य शासनाने ७ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला . या अनुषंगाने भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी अधिकारी जामनेर राजेश नाईक यांनी केली .विद्यार्थ्यांना शाश्वत शेती म्हणजे काय याची माहिती व्हावी म्हणून शाळेतील इको क्लब तर्फे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये परसबाग हा उपक्रम सुरू करण्यात आला . शाळेतील विद्यार्थ्यांना कृषी अधिकारी राजेश जी नाईक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कविता सानप यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







