• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रीडा

बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार, डॉ.भावना जैन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 7, 2025
in क्रीडा, राष्ट्रीय
बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार, डॉ.भावना जैन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

*मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैनची आघाडी*

 

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार, डॉ.भावना जैन यांचा विश्वास

 

जळगाव दि.७ प्रतिनिधी* – जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. स्पर्धेत शुक्रवारी शेवटची फेरी खेळली जाणार असून विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत सुरु आहेत. मुलांमध्ये दिल्लीचा अरिहत कपिल याने आठ गुण घेत आघाडी घेतली आहे. त्याला ७.५ गुणांसह महाराष्ट्राचा आर्यन मेहता, मनी सरबातो (पश्चिम बंगाल), वोनिश्चिक मंडल (पश्चिम बंगाल) लढत देत आहेत. मुलींमध्ये महाराष्ट्राची क्रिशा जैन हिने आघाडी घेतली आहे. तिच्यासमोर वंशिका (दिल्ली) आणि जानकी (केरळ) यांनी आव्हान उभे केले आहे.

 

मुलांच्या लढती अशा रंगल्या

 

जैन हिल्स येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ३९२ मुले आणि १७७ मुली सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यात पहिल्या दिवसांपासून जोरदार लढती सुरु आहेत. स्पर्धेतील नववी फेरी रंगतदार झाली. आघाडीवर असलेल्या खेळाडूंचे सामने अनिर्णित राहिले. पश्चिम बंगालमधील मनी सरबातो आणि अरहित कपिल यांचा सामना बरोबरीत सुटला. यामुळे कपिल याचे आठ गुण झाले तर मनी सरबातो ७.५ गुणांवर आहे. महाराष्ट्राचा अद्वित अग्रवाल आणि पश्चिम बंगालचा अवरित चव्हाण यांच्यातील नवव्या फेरीतील सामनाही बरोबरीत राहिला. कर्नाटकमधील अभिनव आनंद आणि महाराष्ट्रातील अविरत चौहान यांचा लढतीचाही निकाल लागला नाही. तो सामनाही बरोबरीत राहिला. परंतु महाराष्ट्राचा आर्यन मेहता याने तेलंगणातील नदोष शामल याचा पराभव करत स्पर्धेत चुरस कायम ठेवली. पॉडिचेरी येथील राहुल रामकृष्ण आणि गुजरातमधील विहान यांची लढतसुद्धा बरोबरीत राहिली. पश्चिम बंगालमधील वोनिश्चिक मंडल याने धुव्र गुप्ता याचा पराभव केला.

 

मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशासमोर आव्हान

मुलांप्रमाणे मुलींच्या गटात नवव्या फेरीअखेर चांगलीच चुरस आहे. महाराष्ट्रातील क्रिशा जैन हिने ८ गुण घेत विजेतेपदाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. क्रिशा हिने नवव्या फेरीत केरळमधील दिवी बिजेस हिला पराभूत केले. समीहा (तेलंगणा) आणि वंशिका रावल (दिल्ली) यांच्या लढतीत वंशिका विजयी झाली. तेलंगणातील अलाहिमा हिचा केरळमधील जानकी एस डी हिने अटीतटीच्या लढतीत पराभव केला. महाराष्ट्रातील क्रिशा ही ८ गुणांसह आघाडीवर आहे तर वंशिका आणि जानकी ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

कौशल्य दाखवण्याचे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ-डॉ.भावना जैन

 

गुरुवारी सकाळच्या सत्राचे उद्घाटन कांताई नेत्रालयाच्या प्रमुख डॉ.भावना जैन यांनी बुद्धिबळाच्या पटावरील चाल खेळत केले. यावेळी खेळाडूंसोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, देशभरातून आलेले सर्व खेळाडू जैन हिल्स येथे सुरु असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमच्यातील काही जण उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू होणार आहेत. देशातील नामांकीत बुद्धिबळपटू तयार होणार आहे. त्यासाठी तुमच्यात असलेले कौशल्य दाखवण्याचे हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ तुम्हाला मिळाले आहे. त्याचा पुरेपुर लाभ घ्या, असे आवाहन डॉ.भावना जैन यांनी केले. उद्घाटन प्रसंगी जळगाव बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, मुख्य पंच देवाशीष बरुआ उपस्थित होते. स्पर्धेसाठी अरविंद देशापांडे, प्रविण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी, संजय पाटील परिश्रम घेत आहेत.

 

*फोटो ओळ* –

  1.  जैन हिल्स येथे ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चाल खेळत उद्घाटन करताना डॉ.भावना जैन, सोबत नंदलाल गादिया, देवाशीष बरुआ.
बातमी शेअर करा !
Previous Post

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

Next Post

इको क्लब तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात शाश्वत शेती दिन’ साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इको क्लब तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात शाश्वत शेती दिन’ साजरा

इको क्लब तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात शाश्वत शेती दिन' साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif