• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शिक्षकांचा पर्यावरणपूरक सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 30, 2026
in जळगाव, Uncategorized, शैक्षणिक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  : शिक्षणाबरोबरच संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूल-प्रायमरी व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल-सेकंडरी मध्ये गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

अनुभूती इंग्लिशम मिडीयम स्कूल सेकंडरी मधील कार्यक्रमाची सुरुवात गुरुपौर्णिमेच्या दिनविशेषाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुची महती सांगणारे भावपूर्ण गीत सादर करून गुरुंच्या ज्ञानदानाच्या कार्याला अभिवादन केले. संत कबीर यांच्या विचारांचा प्रभावी आविष्कार घडविणारे ‘कबीर के दोहे’ विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी गुरुंचे जीवनातील स्थान आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद करणारे मनोगत व्यक्त केले. अरुणीच्या गुरुभक्तीवर आधारित नाटिकेने उपस्थितांना अंतर्मुख केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेले आकर्षक नृत्य आणि भावपूर्ण गुरुवंदना यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा पर्यावरणपूरक पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला. पर्यावरणपूरक पद्धतीने व्यक्त केलेली ही कृतज्ञता कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या रश्मी लाहोटी होत्या. मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुंच्या शिकवणीचे आचरण करत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने “एक पेड माँ के नाम” हा संकल्प स्वीकारून प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावावे, त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण रक्षणात सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश दिला. कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती हर्षा वाणी व पूजा पाटील यांची होती. कु. स्वरा महाजन व कु. जिविका जडे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.

*एकलव्य-द्रोणाचार्य नाटिकेतून गुरूशिष्याची महती…*

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल-प्रायमरी मधील चिमुकल्यांनी एकलव्य-द्रोणाचार्य नाटिका सादर केली. संपूर्ण शाळेचे गीतासह समूह नृत्याताने दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली ग्रीडींग कार्ड व पुष्प देऊन गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपल्या जीवनात गुरूंची महत्त्व काय असते यावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुरूपोर्णिमेचा सोहळा झाला. सोनाली पाटील, उज्ज्वला तळेले, अश्विनी दहाले यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करा !
Tags: अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलएक पेड माँ के नामगुरुपौर्णिमागुरूंचा सन्मानजळगावपर्यावरण संरक्षण
Previous Post

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे… महापौर श्री पंत मंदिर येथे

Next Post

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif