• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पूजन करून व्यक्त केली कृतज्ञता; भारतीय गुरु-परंपरा, महान विभूतींचे विचार आणि जीवनमूल्यांचा दिला प्रेरणादायी संदेश.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 30, 2026
in जळगाव, Uncategorized, शैक्षणिक
अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. विद्यार्थ्यांना गुरुचे जीवनातील महत्त्व, भारतीय गुरु-परंपरा तसेच महान विभूतींच्या जीवनकार्याची आणि त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीची ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या पावन प्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, अंबिका जैन यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुजनांप्रती सदैव आदर आणि कृतज्ञतेची भावना जपण्यास तसेच महान विभूतींच्या शिकवणीचा आपल्या जीवनात अंगीकार करण्यास प्रेरित केले.

 

गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी सुंदर पुष्पे आणून त्यांचे पूजन केले आणि शिक्षकांचे आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी गुरुची महती आणि भक्तिभाव व्यक्त करणारी सुंदर भजने व भक्तिगीते सादर केली. त्यांच्या मधुर गायनामुळे विद्यालयाचे वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमात शिक्षकांनी भारताच्या गुरु-परंपरेतील प्रेरणादायी महापुरुषांच्या जीवनावर विशेष सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना भगवान महावीर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, आचार्य चाणक्य, आर्यभट्ट, गुरु नानकदेव, लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि भगवान बुद्ध यांच्या जीवनकार्याची व शिकवणीची माहिती देण्यात आली. या महान विभूतींच्या जीवनातून विद्यार्थ्यांना अहिंसा, आत्मसंयम, करुणा, मानवता, समानता, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिश्रम, दूरदृष्टी, सेवा आणि लोककल्याण यांसारख्या जीवनमूल्यांची प्रेरणा मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रद्धापूर्वक माता सरस्वती, महर्षी वेदव्यास तसेच अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

 

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुष्प देऊन आशीर्वाद घेतले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना हा संदेश देण्यात आला की, गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. गुरुचे ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. गुरुपौर्णिमेचा हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सण न राहता गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता आणि ज्ञानाबद्दल समर्पणाची भावना जागविणारा प्रेरणादायी अनुभव ठरला. भारतीय ज्ञानपरंपरेतील महान गुरु आणि विभूतींच्या विचारांशी विद्यार्थ्यांना जोडणारा हा कार्यक्रम अत्यंत अर्थपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

बातमी शेअर करा !
Tags: अनुभूती बाल निकेतनअनुभूती विद्या निकेतनगुरु -परंपरागुरुपौर्णिमाजळगावशिक्षकांचा सन्मान
Previous Post

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

Next Post

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर*

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 16, 2026
जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

October 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif