• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

श्री पंतावधूत मठीत येथे बुधवारी गुरुपौर्णिमा उत्सव; विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन!

भजन, नामस्मरण, महाआरती, वृक्षारोपण तसेच बालगृहातील मुलांना कपडे वाटपाचा उपक्रम; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 28, 2026
in जळगाव, अध्यात्म
श्री पंतावधूत मठीत येथे बुधवारी गुरुपौर्णिमा उत्सव; विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : श्री पंतावधूत मठी अवधूत भजन मंडळ, जळगाव यांच्या वतीने बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांनी हा उत्सव साजरा केला जाणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

उत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता नित्यसेवेने होईल. त्यानंतर पादुका अभिषेक पूजन, नामस्मरण, मौन नामस्मरण, भजनसेवा, अल्पोपहार, श्रीपंत बोधपीठ व बोधसत्र, महाआरती, पुष्पांजली आणि धावा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील.

याच दिवशी सकाळी १२.३० ते १.१५ या वेळेत मनपा शाळा क्रमांक ३ च्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी ४.३० वाजता स्वातंत्र्य चौक येथील मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांना कपडे वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी महापौर दिपमाला काळे, नगरसेविका मंगला चौधरी, डॉ. निलेश चांडक, नगरसेविका विद्याताई सोनवणे, नगरसेवक पियुष कोल्हे आणि नगरसेवक कल्पेश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाचे स्थळ श्री पंत मंदिर, मनपा शाळा क्र. ३, पांजरापोळ पाण्याच्या टाकीजवळ, जळगाव असे असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून गुरुपौर्णिमा उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पंतावधूत मठी , अवधूत भजन मंडळ, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अवधूत भजन मंडळगुरुपौर्णिमागुरुपौर्णिमा २०२६जळगावश्री पंत मंदिरश्री पंतावधूत मठ
Previous Post

मविप्र बनावट लेटरहेड प्रकरणी ॲड. विजय पाटील यांना अटक

Next Post

मनपाच्या अतिक्रमण विभागाची नियमबाह्य जाहिरात फलकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन करणारे फलक हटवले

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मनपाच्या अतिक्रमण विभागाची नियमबाह्य जाहिरात फलकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन करणारे फलक हटवले

मनपाच्या अतिक्रमण विभागाची नियमबाह्य जाहिरात फलकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन करणारे फलक हटवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif