जळगाव -मूळजी जेठा महाविदयालयातील स्पर्धा परीक्षा समिती आणि “करिअर कट्टा” यांच्या संयुक्त विद्यमानाने आज स्वप्न अधिकारी होण्याचे, तयारी स्पर्धा परीक्षेची” या विषयावर प्रशासकीय अधिकारी तसेच जळगाव जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांचे विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांचे स्वागत प्राचार्य डॉ संजय भारंबे यांनी केले तर प्राचार्यांचे स्वागत डॉ शमा सुबोध यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना स्पर्धा परीक्षा समीती प्रमुख डॉ राजीव पवार यांनी केली. सुत्रसंचलन रुचिता सोनगीरे हिने केले. या कार्यशाळेत बोलतांना अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते म्हणालेत, ” मी बीड जिल्ह्याचा रहिवासी, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे. चौथीला असताना गावात लाईट आले.या परीस्थितीतून मी इथवर पोहोचलो आहे. नाॅलेज स्कील अँटीट्यूड हे तीन टप्पे स्पर्धा परीक्षेचे असतात. आजकाल विद्यार्थ्यांना सवय फक्त आँब्जेक्टीव्हची असते. त्याने काही होणार नाही अधिकार्यांना ड्राफ्टींगची सवय हवी.. त्यांना अनेक रिपोर्ट तयार करावे लागतात.त्यासाठी तुम्ही सेल्फ स्टडी सुध्दा करु शकतात. भारतिय राज्यघटना मी दिड महिने वाचत होतो. कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, हे समजले पाहिजे. हे समजून घेऊनच अभ्यासाला सुरुवात करा. मी सुरवातीला ग्रामसेवकची परीक्षा दिली रोजगार मिळावा म्हणुन पुणे जिल्ह्य़ात ग्रामसेवक दोन वर्ष काम केले. अभ्यास सुरू ठेवला आणि पुढे क्लास टु आँफीसर झालो. या परीक्षांसाठी गरज, इच्छा, क्षमता, प्रचंड हार्डवर्क, पेशन्स, आवश्यक असते. गरज आहे का? घरात केळीचे उत्पन्न वर्षाला ऐशी लाख आहे. तर स्पर्धा परीक्षेची गरज आहे का! लक्षात घेऊन तयारी करा सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे का? इथे क्षमता किंवा कपॅसिटी हा देखील फारत महत्वाचा क्रायटेरिया आहे. स्वतःला अंडर इस्टीमेट करुतत नका. मात्र क्षमता लक्षात घेऊन तयारी करा. कुठेतरी तुम्ही सिलेक्ट नक्कीच होणार.अर्थात, लक आणि हार्डवर्क हे ही जोडीने चालतात. 95 % हार्डवर्क आणि 5%लक असते. युपीएससी, एमपीएससी सगळीकडे अभ्यास सारखा असतो. शेवटी ही कॉम्पिटीशन आहे. लाखो मुले अभ्यास करतात. यशासाठी प्रचंड पेशन्स पण असावे लागतात. पहिली दोन वर्षे पुर्णपणे झोकुन देऊन अभ्यास करा, या परीक्षेसाठी 100% वेळ द्या. नंतर फाउंडेशन पक्के झाले की त्यानंतर नोकरी करून अभ्यास करू शकतात. संघर्ष टळत नाही. सॅक्रिफाईज करावे लागेल.पण जे शाश्वत आहे ते निवडा. मला आजही, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वडापाव खाल्लेला आठवतो. कारण दिवाळीला गावाकडे जायचो नाही. लोक चिडवायचे, कधी कधी विचारायचे, कधी साहेब होणार? पण आभ्यासाचीच नशा होती. तुम्हाला पाहुणे, सण, मित्र मैत्रिणी सुध्दा सर्व विसरावे लागेल. पास झालो तेव्हा सगळ्या हिणवणारे लोकांचे फोन आले. अभ्यासाचाच नशा हवा स्पर्धा परीक्षेसाठी, इतर व्यसनांना बळी पडू नका. करीयर हवे असेल तर सॅक्रीफाईस करावेच लागेल. दोन न्युज पेपर वाचुन नोट काढा. कला साहित्य संस्कृती राजकारण अंतर राष्ट्रीय घडामोडी सगळे नीट वाचा नोंद ठेवा. हा खरंतर सापशिडीचा खेळ आहे. अपयश आले तर परत तयारीला लागा. मला स्वतःला सेल्फ कमांड द्यायची सवय होती अभ्यासाला बसताना ॐकार करुन (मेडिटेशन करून) सेल्फ कमांड द्यायचो. त्यानंतर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ भारंबे यांनी आपल्या महाविद्यालयात करीयर कट्टा अंतर्गत, पोलिस आणि सैन्य भरती केंद्र सुरू करत असल्याचे जाहिर केले. आपल्या महाविद्यालयात हे केंद्र सुरू होत आहे त्याचा उपयोग करून घ्या. कारण, जे विद्यार्थी या सभागृहात बसले आहे, त्यापेक्षा काही पटीने जास्त विद्यार्थी आज आपल्या महाविद्यालयातून पोलीस दलात आणि सैन्य दलात भरती झालेले आहे. त्यामुळे या परंपरेचा उपयोग करून घ्या. या कार्यक्रमासाठी प्रा योगेश बोरसे, डॉ राम बुधवंत तसेच करीयर कट्टा मुख्यमंत्री निलम पाटील, नियोजन मंत्री राहूल महाजन आणि संपुर्ण मंत्रीमंडळात सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here