• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 1, 2025
in क्राईम, जळगाव
माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव माजी नगरसेवक बंटी अनंत जोशी यांनी आज सायंकाळी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. बंटी जोशी महापालिकेचे माजी नगरसेवक असून काही काळ मनसेमध्ये होते. त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा अद्याप शोध लागला नसला तरी पुढील तपास चालू आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात बंटी जोशी यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहर महानगरपालिकेतील नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी (वय-५०) यांनी शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी आपल्या जयनगर परिसरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी बंटी जोशी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बंटी जोशी हे जळगाव मनपातील अभ्यासू नगरसेवक, हसत खेळत व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवारने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे, सुनील महाजन, शरद तायडे, सुनील झंवर, शामकांत सोनवणे, आयुष मणियार, पीयूष कोल्हे, पीयूष मणियार, सरिता माळी, कैलास आप्पा सोनवणे, कुंदन काळे, गणेश सोनवणे, जमील देशपांडे, प्रवीण कोल्हे यांच्यासह मित्र परिवार जमला आहे.

माजी नगरसेवक अनंत जोशी हे ‘बंटी जोशी’ या नावाने जळगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणावर नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी आवाज उठवला होता. महापालिकेमध्ये एक ‘अन्यायाविरुद्ध लढणारा नगरसेवक’ म्हणून त्यांची ओळख होती. विरोधक म्हणून त्यांनी लोकशाही मधील आपली भूमिका यशस्वीपणे मांडल्यामुळे जनमानसात त्यांना ‘बंटी भाऊ’ अशी ओळख निर्माण झाली होती. अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या माजी नगरसेवकाच्या आत्महत्यामुळे समर्थक आणि मित्र परिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

स्वप्न अधिकारी होण्याचे: अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Next Post

वर्ल्ड इंग्लिश स्कुल आमोदे (खू) येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

वर्ल्ड इंग्लिश स्कुल आमोदे (खू) येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif