• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

शिरसोली प्र. बो. येथे नवीन पोलीस मदत केंद्र सुरू!

बाजारपट्टा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस मदत केंद्राशी जोडले; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची पाहणी ग्रामपंचायतिचा पुढाकार.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 19, 2026
in जळगाव ग्रामीण
शिरसोली प्र. बो. येथे  नवीन पोलीस मदत केंद्र सुरू!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

शिरसोली प्र. बो. (ता. जळगाव) : गावात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी शिरसोली प्र. बो. ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेत नवीन पोलीस मदत केंद्र सुरू केले आहे. ग्रामपंचायतीतर्फे एमआयडीसी अंतर्गत बाजारपट्टा परिसरात पोलीस मदत केंद्रासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासोबतच ग्रामपंचायतीने बाजारपट्टा परिसर, जळगाव–पाचोरा महामार्ग तसेच गावातील मुख्य रस्त्यांवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने सुरू झालेल्या पोलीस मदत केंद्राशी जोडले आहेत. त्यामुळे परिसरातील हालचालींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार असून, गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी मिळणार आहे.

नूतन पोलीस मदत केंद्राची पाहणी करण्यासाठी जळगावचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP), एमआयडीसी जळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI), शिरसोली बिटचे हवालदार तसेच गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गावातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव_बातम्यापोलीस_मदत_केंद्रशिरसोलीशिरसोली_पोलीस_मदत_केंद्रशिरसोली_प्र_बो
Previous Post

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदीअनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड!

Next Post

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif