• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील नाक-कान-घसा तज्ज्ञांकडून यशस्वी उपचार.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 17, 2026
in जळगाव, आरोग्य
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : सतत डोकेदुखीचा त्रास आणि नाक व कानातून सतत पाण्यासारखा द्रव बाहेर येत असल्याने त्रस्त असलेल्या एका तरूणीवर नाक-कान-घसा (ईएनटी) तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. तपासणीअंती संबंधित तरुणाला सीएसएफ ओटोरिया विथ रायनोरिया हा दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे मेंदूभोवती असलेले पाणी नाक व कानावाटे बाहेर वाहत होते. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हा त्रास पूर्णपणे थांबला असून रुग्णाची प्रकृती आता उत्तम आहे.

३५ वर्षीय तरूणीला अनेक महिन्यांपासून डोकेदुखी, नाकातून सतत पाणी येणे तसेच कानातूनही द्रवस्त्राव होण्याचा त्रास होत होता. सुरुवातीला हा साधा सर्दी किंवा कानाचा संसर्ग असल्याचे समजून विविध ठिकाणी उपचार घेण्यात आले. मात्र अपेक्षित फायदा झाला नाही. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नाक-कान-घसा विभागप्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी तरूणीच्या आजाराशी संबंधित आवश्यक तपासण्या केल्या. विशेष तपासण्यांमध्ये मेंदूभोवतीचे सीएसएफ नाक आणि कानामार्गे गळत असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी रुग्णाला सीएसएफ ओटोरिया रिपेअर ही अत्यंत नाजूक व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतील पाणी गळती होणारे छिद्र शोधून ते विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णाच्या नाक आणि कानातून होणारा द्रवस्त्राव पूर्णपणे थांबला आहे. त्याचबरोबर सतत होणार्‍या डोकेदुखीपासूनही त्याची सुटका झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंकज शर्मा, डॉ. शुभम सावकर, डॉ. अंकीता सोलंकी यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली.

 

नाक किंवा कानातून सतत पाण्यासारखा पारदर्शक द्रव बाहेर येत असेल, विशेषतः डोक्याला दुखापत झाल्यानंतर किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे मेंदूतील सीएसएफ गळतीचे लक्षण असू शकते. वेळेत निदान आणि योग्य शस्त्रक्रिया केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचारास विलंब झाल्यास मेंदूला संसर्ग होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो

– डॉ. अनुश्री अक्ष्रवाल विभागप्रमुख,  डॉ. उल्हास पाटील रूग्णालय जळगाव.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्यजळगावनाक_कान_घसामेंदूतील_पाणी_गळतीवैद्यकीयशस्त्रक्रिया
Previous Post

शिरसोली प्र. बो. येथे नवीन पोलीस मदत केंद्र सुरू!

Next Post

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती

'एकही मतदार वंचित राहू नये'; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif