• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदीअनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड!

प्रतिष्ठेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 15, 2026
in जळगाव, Uncategorized, निवडणूक
ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदीअनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी)च्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल कौतिक गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रसंगी लोक सहकार गटाचे अध्यक्ष मनोज पाटील सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी  माजी चेअरमन अजब सिंग पाटील, महेश पाटील, ज्येष्ठ संचालक व्ही झेड पाटील आदी उपस्थित होते  ग.स. सोसायटीतील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असल्याने तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ग.स. सोसायटीवर सहकार आणि प्रगती या दोन्ही गटांची सत्ता असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी दोन्ही गटांमध्ये कार्यकाळानुसार पदवाटपाचा निर्णय झाला होता. मात्र, सहकार गटाने ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला नसल्याचा आरोप प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी यापूर्वी केला होता. अखेर विद्यमान अध्यक्ष अजितसिंग पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज शांततेत पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रागिणी चव्हाण आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर सहकार व लोकसहकार गटाच्या संचालकांनीही दोन्ही पदाधिकाऱ्यांचा गौरव केला. निवडीनंतर समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

या निवडणुकीसाठी डी. व्ही. पाटील, अजित पाटील, मस्के आणि देशपांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच संस्थेचे व्यवस्थापक वाल्मीक पाटील, भगवान मिस्त्री, संजीव पाटील आणि संजय साळुंखे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

दरम्यान, मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बातमी शेअर करा !
Tags: अनिल गायकवाडग.स. सोसायटीग.स. सोसायटी जळगावजळगाव बातम्यारागिणी चव्हाणसहकारी पतपेढी
Previous Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

Next Post

शिरसोली प्र. बो. येथे नवीन पोलीस मदत केंद्र सुरू!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिरसोली प्र. बो. येथे  नवीन पोलीस मदत केंद्र सुरू!

शिरसोली प्र. बो. येथे नवीन पोलीस मदत केंद्र सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif