• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद

'खानदेश कॅटरिंग असोसिएशन'चा मोठा निर्णय!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 15, 2026
in जळगाव, स्थानिक बातम्या
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :  जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसायाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता २१ जुलै २०२६ पासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रात्री १ वाजेनंतर कोणत्याही प्रकारची कॅटरिंग सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’च्या वतीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कामगारांचे आरोग्य आणि वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊल

गेल्या काही काळापासून लग्न कार्ये आणि इतर समारंभांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने कॅटरिंग कामगारांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत होता. उशिरापर्यंत काम संपवून अवघ्या काही तासांत, म्हणजेच सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा कामावर हजर व्हावे लागत असल्याने कामगारांची झोप पूर्ण होत नव्हती. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे रात्रीच्या वेळी कामगारांचे अपघात होण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले होते. या गंभीर बाबींची दखल घेत असोसिएशनने हा कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१२ जुलै रोजी येथील ओक मंगल कार्यालयात खानदेश कॅटरिंग असोसिएशनची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कॅटरिंग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या संमतीने हा नवा नियम २१ जुलै २०२६ पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत यांनी दिली. या महत्त्वपूर्ण बैठकीला असोसिएशनचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मार्गदर्शक उपस्थित होते.

यामध्ये जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश टाटिया, जळगाव शहर अध्यक्ष सत्यनारायण जोशी, शहर उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव महेंद्र टाडा, खजिनदार गोपाल व्यास, मुख्य सल्लागार राजेंद्र वैष्णव यांच्यासह रामचंद्र टाडा, मेघराज महाराज, गोवर्धन गुर्जर, दुर्गेश सारस्वत, शिव अग्याल, भवर व्यास, मदन पुरोहित, मदन वैष्णव, बबलु महाराज, मोहन महाराज, शिवा तिवारी, ओम् प्रजापत, केदार शर्मा, गुलाब महाराज आणि जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख कॅटरिंग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या नियमामुळे आता जिल्ह्यातील लग्नकार्ये आणि सोहळ्यांच्या नियोजनातही बदल करावा लागणार असून, कामगारांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कामगारकॅटरिंग सेवाखानदेशखानदेश कॅटरिंग असोसिएशनजळगावजळगाव न्यूजलग्न समारंभ
Previous Post

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवर अभ्यासपूर्ण संशोधन; पौर्णिमा मोहित ठोके-देशमुख यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.

Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif