• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित!

दिव्याज फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान; सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल अमृता फडणवीस यांची उपस्थिती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 24, 2026
in जळगाव, सामाजिक
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव: जिल्ह्यातील सुरवाडा येथील रहिवासी तथा दादाश्री विश्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. सन २०२६ च्या पुरस्कारासाठी लोहारा येथील रहिवासी डॉ. प्रीतीश चौधरी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे सन्मानित करण्यात आले.

दि. २१ जून रोजी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे भारतीय जैन संघटना आणि दिव्याज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

डॉ. प्रीतीश चौधरी हे दादाश्री विश्व ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहेत. बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच वंचित घटकांसाठी कार्य करणे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारामुळे समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, शोषित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना डॉ. प्रीतीश चौधरी यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !
Tags: अमृता_फडणवीसजळगाव_बातमीडॉ_प्रीतीश_चौधरीदादाश्री_विश्व_ग्रुपदिव्याज_फाउंडेशननियतीचे_चक्र_पुरस्कार
Previous Post

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन;

Next Post

मनपाच्या कचरा डेपोवरील वजन काटा आता स्वमालकीचा !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मनपाच्या कचरा डेपोवरील वजन काटा आता स्वमालकीचा  !

मनपाच्या कचरा डेपोवरील वजन काटा आता स्वमालकीचा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif