• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मनपाच्या कचरा डेपोवरील वजन काटा आता स्वमालकीचा !

अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमताला चाप; वजनातील घोटाळा रोखण्यासाठी उपमहापौरांच्या पाठपुराव्याला यश ; दालनात दिसणार CCTV लाईव्ह स्क्रीन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 24, 2026
in जळगाव, महापालिका
मनपाच्या कचरा डेपोवरील वजन काटा आता स्वमालकीचा  !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील हलगर्जीपणा आणि काही ठराविक अधिकारी व ठेकेदारांच्या फायद्यासाठी जळगावकरांच्या कराच्या पैशांची होत असलेली उधळपट्टी अखेर थांबण्याच्या मार्गावर आली आहे. उपमहापौर मनोज चौधरी यांनी गेल्या दोन महासभांमध्ये सातत्याने केलेल्या आक्रमक पाठपुराव्यानंतर कचरा डेपोवरील मनपाच्या स्वतःच्या मालकीचा वजन काटा अखेर सुरू करण्यात आला आहे.

मनपाकडे स्वतःचा वजन काटा उपलब्ध असतानाही, केवळ सुमारे तीन लाख रुपयांच्या दुरुस्तीअभावी तो अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत होता. यामुळे प्रशासनाकडून खाजगी वजन काट्यांचा वापर करण्यात येत होता आणि त्यासाठी लाखो रुपयांची बिले अदा केली जात होती. स्वतःची यंत्रणा असतानाही खाजगी यंत्रणांवर अवलंबून राहिल्यामुळे मनपाच्या महसुलावर मोठा ताण पडत होता.

याबाबत उपमहापौर मनोज चौधरी यांनी महासभेत प्रशासनावर जोरदार टीका करत, “जळगावकरांच्या टॅक्सच्या पैशांची उधळपट्टी थांबवली पाहिजे,” अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर प्रशासनाने दखल घेत वजन काटा कार्यान्वित केला आहे.

आता थेट उपमहापौरांच्या दालनातून होणार देखरेख

कचरा डेपोवरील वजन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या कॅमेऱ्यांचे लाईव्ह फीड थेट उपमहापौर मनोज चौधरी यांच्या दालनातील स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे कचऱ्याच्या वजनात होणारे संभाव्य घोळ, चुकीची नोंद किंवा आर्थिक गैरव्यवहारावर थेट नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

मनपा प्रशासनातील काही अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतामुळे होणाऱ्या कथित गैरप्रकारांना यामुळे मोठा आळा बसणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.

‘टीबी हाऊस’ येथील वजन काटाही लवकरच सुरू होणार

कचरा डेपोवरील वजन काटा सुरू झाल्यानंतर आता शहरातील ‘टीबी हाऊस’ परिसरात असलेला दुसरा बंद पडलेला वजन काटाही तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याच्या सूचना उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या महसुलातील गळती रोखण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कचरा डेपोजळगाव न्यूजजळगाव मनपामनपा घोटाळामनोज चौधरीवजन काटा
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित!

Next Post

वरुणराजा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वरुणराजा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला !

वरुणराजा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif