• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने यजुर्वेंद्र महाजन सन्मानित

अण्णा हजारे यांच्या हस्ते दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांचा गौरव; पुरस्काराची दोन लाखांची रक्कम ‘दीपस्तंभ मनोबल पुणे’ प्रकल्पासाठी समर्पित

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 26, 2026
in जळगाव, Uncategorized
पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने यजुर्वेंद्र महाजन सन्मानित
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – आदरणीय जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी आणि राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने सामाजिक सेवा गौरव पुरस्कार सोहळा हा दरवर्षी प्रमाणे राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आला. यावेळी देवगडचे महंत भास्करगिरी महाराज ,

पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते. पद्मभूषण अण्णा हजारे यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांच्या रकमेतील निधीच्या व्याजातून हे पुरस्कार दिले जातात.पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने यजुर्वेंद्र महाजन सन्मानित

देशातील दिव्यांग ,अनाथ, ट्रान्सजेंडर व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना निवासी उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची व्यवस्था उभारणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक श्री यजुर्वेंद्र महाजन यांना पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार हा आदरणीय अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशनचे श्री राजेंद्र पाटील, श्री अमोल लंके, श्री मिलिंद आवळगावकर, श्री महेंद्र पाटील, दिव्यांग विद्यार्थी बापू भोसले आणि आश्लेषा आमटे यांच्या समवेत स्वीकारला. दोन लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्री यजुर्वेंद्र महाजन यांनी या पुरस्काराची दोन लाख रुपये रक्कम ही दीपस्तंभ मनोबल पुणेच्या उभारणीसाठी दिली आहे. हा पुरस्कार दीपस्तंभ फाउंडेशनच्या भविष्यातील विस्तारासाठी सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या श्री मधुकर कोतवाल, श्री अजय साठे, डॉ. अलका मांडके, श्री पुखराज पगारिया, श्री एम के सत्या, श्री सुधीर वरदे, श्री दीपक शाह, सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांना श्री यजुर्वेंद्र महाजन यांनी अर्पण केला आहे.

यावेळी श्री यजुर्वेंद्र महाजन म्हणाले की , “आदरणीय अण्णा यांनी त्याग, सेवा, संयम आणि कठोर परिश्रमाच्या आधारे चळवळीच्या माध्यमातून लोकशाही सुदृढ केली आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले. आदरणीय अण्णांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन दीपस्तंभ फाउंडेशनचे कार्य जगभर विस्तारेल. दीपस्तंभचे विद्यार्थी स्वतःबरोबर आजुबाजूचा समाज हा देखील घडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल याप्रसंगी

दीपक नागरगोजे ,अनंत झेंडे, नंदकुमार पालवे ,शिवाजीराव ढोले यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला संत तुकाराम महाराज यांचे नववे वंशज मोरे महाराज, जिल्हा सैनिक अधिकारी , स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट, राळेगणसिद्धी संस्थेचे सर्व संचालक, तसेच अनेक कार्यकर्ते, समाजसेवक तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अण्णा_हजारेदीपस्तंभ_फाउंडेशनयजुर्वेंद्र_महाजनराळेगणसिद्धीसमाजसेवासामाजिक_सेवा_पुरस्कार
Previous Post

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक…

Next Post

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif