• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक…

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून नियमित योगाचा संकल्प..

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 21, 2026
in जळगाव, आरोग्य
मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : सहकाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जैन इरिगेशनतर्फे विविध कार्यशाळा, उपक्रम राबविले जातात. जागतिक योग दिनानिमित्त विशेष योगाभ्यासाचे नियोजन करण्यात आले होते. यात योगशिक्षिक सूर्यागिरीजी अर्थात सुभाष जाखेटे, योगशिक्षिका कमलेश शर्मा यांनी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेच्या आधारावर योगाभ्यास करुन घेतला. ‘योग’, शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम असून मनावर नियंत्रणासाठी योगसाधना केली पाहिजे सांगितेल. कंपनीच्या हजारो सहकाऱ्यांना नियमित योग, व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लीश मिडीअम मधील विद्यार्थ्यांचा नियमीत योग असतोच परंतू योगदिनानिमित्त विशेष सत्राचे आयोजन केले होते.

 

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन जैन प्लास्टिक पार्क, बांभोरी येथील प्रशासकीय इमारतीसमोरील पटांगणात योगशिक्षक सूर्यागिरीजी अर्थात सुभाष जाखेटे यांनी सहकाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले. तसेच जैन ॲग्री पार्क, जैन फूड पार्क व जैन एनर्जी पार्कमधील सहकाऱ्यांसाठी स्पाइस रिसीव्हिंग एरिया येथे तर जैन हायटेक प्लांन्ट टाकरखेडा टिश्यूकल्चर पार्कमध्ये कमलेश शर्मा यांनी योग प्रशिक्षण दिले.

 

योगसत्राच्या प्रारंभी तीन वेळा ओंकार करण्यात आला. त्यानंतर पादांगुली नमन, गुल्फचक्र, जानू-फलक आकर्षण आदी सूक्ष्म व्यायाम, ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन व उत्कटासनाचा सराव घेण्यात आला. प्रत्येक आसनाचे शरीरावरील परिणाम व आरोग्यदायी फायदे समजावून सांगण्यात आले. सत्राच्या शेवटी नाडीशोधन (अनुलोम-विलोम) व भ्रामरी या दोन महत्त्वाच्या प्राणायामांचे प्रात्यक्षिक देऊन ते नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले. योगशिक्षक सुभाष जाखेटे यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करून वयाच्या ८० व्या वर्षीही नियमित योगसाधना केल्याने आरोग्य उत्तम राहत असल्याचे सांगितले.

 

योग शिक्षिका कमलेश शर्मा यांनी शंखनादाने योग अभ्यासाचे सत्र सुरू केले. सूर्यनमस्कार, फिटनेस डॉन्स, योग, ध्यान, प्राणायाम, विविध आसनांसह समुपदेशनही त्यांनी केले. सूर्यनमस्कारचे फायदे सांगत असतांना त्यांनी शिवशक्ती सूस्तीवर विशेष फिटनेस डान्स करुन सहकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. जैन ॲग्री पार्क, जैन फूड पार्क व जैन एनर्जी पार्कमधील सहकाऱ्यांसाठी योग साधनेचे नियोजनासाठी वरिष्ठ सहकारी जी. आर. पाटील, भिकेश जोशी यांच्यासह सहकाऱ्यांनी समन्वयन साधले.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव बातम्याजागतिक योग दिनजैन इरिगेशननिरोगी जीवनयोग अभ्यासयोग साधना
Previous Post

नूतन मराठा महाविद्यालयात VVM टॉपर्सचा गौरव सोहळा उत्साहात

Next Post

पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने यजुर्वेंद्र महाजन सन्मानित

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने यजुर्वेंद्र महाजन सन्मानित

पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने यजुर्वेंद्र महाजन सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif