• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

विद्यार्थ्यांच्या ‘आशा-सुमन स्वर सुमनांजली’ने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 21, 2026
in जळगाव, Uncategorized, सांस्कृतिक
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मृगोत्सव’ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांना समर्पित ‘आशा-सुमन: स्वर सुमनांजली’ हा सांगीतिक कार्यक्रम २० जून २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. पावसाळा आणि संगीताचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी जळगावकर रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

सुरेल आणि मनोहारी सादरीकरण

पावसाच्या आगमनाचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी गायन व नृत्याच्या विविध कलाप्रकारांचे मनोहारी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ओंकार प्रधान’ या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर ‘नाविका रे’, ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर’, ‘केतकीच्या वनी तिथे’, ‘केशवा माधवा’, ‘दो लब्जों की है’, ‘धुंदी कळ्यांनो’, ‘सारे के सारे गा मा को’, ‘चंदा राणी’, ‘जाइए आप कहाँ जायेंगे’, ‘अभी ना जाओ छोड़कर’ आणि ‘ओ मेरे सोना रे’ यांसारखी एकापेक्षा एक लोकप्रिय गीते सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय, ‘पिया बावरी’ आणि ‘कोई शहरी बाबू’ या गाण्यांवर सादर झालेल्या कथक नृत्याच्या आकर्षक प्रस्तुतीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील आणि प्राचार्या सौ. पद्मजा नेवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सहभागी कलाकार व साथसंगत

कार्यक्रमात समीक्षा माकोडे, वेदिका झारे, मंजिरी जोशी, राजश्री पाठक, अलका खैरनार, किरण सानी, नाजनीन शेख, हितेशी प्रजापती, ऐश्वर्या काळकर, नंदा दैवज्ञ, राधिका दैवज्ञ, रिया वर्मा, समृद्धी जोशी, लावण्या दहाड, कनकश्री अय्यंगार, निशिता चौधरी, निकिता जोशी, प्रणव ईखे, पूजा नारखेडे, दिशा महाजन, काव्या बोबडे, आरुषी अदमाने, रिया दहाड, स्वरा थोरात, अथर्व पाटील, डेलिना अतरदे, धनश्री जोशी, वीरा चौधरी, वैदेही राजपूत, आरोही सूर्यवंशी आदी बाल व युवा कलाकारांनी आपल्या कलेचे प्रभावी सादरीकरण केले.

या कलाकारांना सिंथेसायझरवर श्री. सुशील महाजन, ऑक्टोपॅडवर प्रा. देवेंद्र गुरव आणि तबल्यावर श्री. प्रवीण महाजन यांनी सुरेल साथसंगत केली.

उत्कृष्ट संयोजन व परिश्रम

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संध्या फासे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा यांनी मांडले. आभार प्रदर्शन श्री. भूषण खैरनार यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पद्मजा नेवे आणि डॉ. महिमा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक राजू पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी आणि ईश्वर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात आशा भोसले व सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा सुरेल आविष्कार अनुभवायला मिळाल्याने उपस्थित रसिकांनी कलाकारांचे भरभरून कौतुक केले.

बातमी शेअर करा !
Tags: आशाभोसलेगीतेगोदावरीसंगीतमहाविद्यालयजळगावमृगोत्सवसंगीतकार्यक्रमसुमनकल्याणपूरगीते
Previous Post

पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने यजुर्वेंद्र महाजन सन्मानित

Next Post

पाथरीत अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पाथरीत अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार!

पाथरीत अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif