• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

जळगाव शहरातील नेताजी सुभाषबाबू चौकाने घेतला मोकळा श्वास

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 17, 2026
in जळगाव, कारवाई, महापालिका
पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि मुख्य बाजारपेठ परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मंगळवारी संध्याकाळी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, घाणेकर चौक ते प्रकाश मेडिकल चौकापर्यंतच्या परिसराची पायी चालत पाहणी केली. दोन दिवसांपूर्वीच मनपाच्या अतिक्रमण विभागाने येथील मोठे अतिक्रमण हटवून या चौकांना मोकळा श्वास करून दिला आहे.

आता यापुढे या परिसरात शिस्त आणण्यासाठी हॉकर्स आणि पार्किंगसाठी पिवळे पट्टे आखून दिले जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. या पाहणी दौऱ्यात स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘पिवळ्या पट्ट्या’च्या आतच करावा लागेल व्यवसाय

दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर आता या परिसरातील हॉकर्सचे पुनर्वसन शिस्तबद्ध पद्धतीने केले जाणार आहे. हॉकर्सना व्यवसायासाठी विशिष्ट जागा निश्चित करून तिथे पिवळे पट्टे आखून दिले जातील. हॉकर्सनी या पिवळ्या पट्ट्यांच्या आतच बसून आपला व्यवसाय करायचा आहे. जे हॉकर्स पट्ट्याबाहेर येऊन रस्त्यावर अतिक्रमण करतील, त्यांच्यावर जप्तीची कडक कारवाई केली जाईल, अशी थेट तंबी महापौरांनी उपस्थित हॉकर्स बांधवांना दिली.

पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि पुतळा परिसर राहणार मोकळा

वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने आणि पुतळ्या जवळील अतिक्रमणाबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले:

नो-अतिक्रमण झोन: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याभोवती कोणालाही व्यवसाय करण्यास बसू दिले जाणार नाही. पुतळ्याच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमण पूर्णपणे काढले जाईल.

पार्किंग पट्टे: वाहनधारकांसाठी पार्किंगचे पट्टे आखून दिले जातील. पट्ट्याबाहेर पार्क केलेल्या दुचाकींवर तात्काळ कारवाई केली जाईल.

पर्यायी जागा: सुभाषचंद्र बोस पुतळ्यापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत एक ‘लेन’ तयार करून तेथे हॉकर्सला जागा देता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.

दाणाबाजारातील अवजड वाहनांना तंबी

सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत दाणाबाजार परिसरात अवजड वाहनांना बंदी असतानाही वाहने येत असल्याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यावर महापौर कमालीच्या आक्रमक झाल्या. “बंदीच्या वेळेत येथे अवजड वाहने कशी येतात? नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागता कामा नये,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. तसेच, अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ विभागाला तात्काळ पत्र देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

रस्त्यावरील कचरा पाहून महापौर संतापल्या; डस्टबिन बंधनकारक

दाणाबाजार भागात उघड्यावर पडलेला कचरा पाहून महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. “स्वच्छता राखणे ही केवळ मनपाची नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी जबाबदारी निश्चित करून दिली.

१. दाणा बाजारातील प्रत्येक दुकानदाराने आणि चौकातील हॉकर्सने आपल्या दुकानाजवळ डस्टबिन (कचराकुंडी) ठेवणे बंधनकारक आहे.

२. सर्व कचरा स्वतःच्या डस्टबिनमध्येच गोळा करावा लागेल.

३. व्यावसायिकांच्या सोयीसाठी या भागात दिवसातून शक्य झाल्यास दोन वेळा घंटागाडी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.

४. दाणाबाजार व्यापारी असोसिएशनने आणि हॉकर्स बांधवांनी जळगाव शहर सुंदर आणि स्वच्छ दिसावे यासाठी मनपा प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान पथविक्रेता समितीचे मोहन तिवारी, दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अशोक राठी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक व्यापारी, हॉकर्स आणि नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अतिक्रमण हटवणेजळगावपिवळे पट्टेमहापालिकावाहतूक व्यवस्थाहॉकर्स
Previous Post

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार!

Next Post

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif