• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार!

नंदूभाऊ महाजन : जनमानसात रुजलेलं अभ्यासू नेतृत्व, विधानपरिषदेसाठी सज्ज!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 16, 2026
in जळगाव, राजकारण
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य न्यूज नेटवर्क

जळगाव: आजच्या बदलत्या राजकीय पटलावर सत्तेसाठी वारंवार भूमिका आणि पक्ष बदलणारे नेते जळगाव जिल्ह्याने पाहिले आहेत. अशा अस्थिर राजकीय वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत असताना, आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून एकच पक्ष आणि एकच झेंडा सोबत ठेवणारे प्रामाणिक नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. विधानपरिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, यंदाची लढाई महायुतीच्या भक्कम साथीने सोपी झाली असल्याचे चित्र आहे. तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा ‘आमदार’ पदाचा बहुमान नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या चर्चेवर आता जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब होत आहे.

 

स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकीची जपणूक

आजच्या राजकारणात शब्द आणि कृती यात मोठी दरी पाहायला मिळते. मात्र, नंदूभाऊ महाजन याला अपवाद आहेत. जे मनात तेच ओठावर, हा त्यांचा स्वभाव असून जनतेच्या प्रश्नांवर किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी बोलताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. निवडणुकीच्या काळात अनेकदा समाजात जातीपातीचे राजकारण केले जाते. परंतु, नंदूभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनात कधीही जाती-पातीच्या चौकटी स्वीकारल्या नाहीत. त्यांच्या मते, ‘माणुसकी’ हाच एकमेव धर्म आणि ‘माणूस’ हीच एकमेव जात आहे.

 

शेतकरी समाजासाठी आशेचा नवा किरण

नंदूभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण विकासाची कास धरली. त्यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या कार्यकाळात सर्व सहकारी सदस्यांचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी राहिले. तापी, पूर्णा आणि गिरणाकाठच्या शेतकरी समाजासाठी ते आता आशेचा नवा किरण ठरत आहेत. मतदारसंघामध्ये आमदारकीसाठीजी कोणी नेता नव्हे, तर एक कुटुंबप्रमुखच निवडणूक लढवत असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे.

 

महायुतीची भक्कम साथ; विक्रमी विजयाचा विश्वास

जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्षांना जनतेचा प्रचंड कौल मिळाला असल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. गेल्या २५ वर्षांतील त्यांची सर्वसमावेशक छबी ही त्यांची जमेची बाजू आहे.

“पक्ष दोन नव्हे चार डोळ्यांनी पाहत असतो, हे नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर मांडलेले निरीक्षण तंतोतंत खरे आहे. महायुतीतील सर्व मतदार-लोकप्रतिनिधी आपली पक्षनिष्ठा व महायुतीचा धर्म नक्की निभावतील आणि हा विजय ऐतिहासिक असेल.”

— चंद्रकांत बाविस्कर (जिल्हाध्यक्ष, भाजपा)

पहिल्यांदाच खरा शेतकरी विधानपरिषदेची पायरी चढणार!

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत व्यापारी किंवा बड्या नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तीलाच आमदारकीची संधी मिळत आल्याचा इतिहास आहे. मात्र, विधानपरिषद हे कायदे करणारे वरिष्ठ सभागृह असल्याने तिथे अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व जाणे गरजेचे आहे.

यंदा नंदूभाऊंच्या रूपाने खऱ्या अर्थाने जमिनीशी जोडलेला शेतकरी आणि ग्रामीण-नागरी प्रश्नांची उत्तम जाण असणारा लोकनेता सभागृहात पोहोचणार असल्याने, जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावी आवाज मिळेल, असा ठाम विश्वास जिल्हाभरातून व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावनंदकिशोर महाजननंदूभाऊ महाजनभाजपामहायुतीविधान परिषद निवडणूक
Previous Post

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब!

Next Post

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif