• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रायसोनी नगरातील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाची महापौरांकडून पाहणी!

लवकरच होणार विकासकांच्या माध्यमातून पुनर्विकास

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 8, 2026
in जळगाव, महापालिका
रायसोनी नगरातील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाची महापौरांकडून पाहणी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील रायसोनी नगर भागात असलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान गेल्या काही काळापासून बंद अवस्थेत आहे. या उद्यानाचा विकासकांद्वारे कायापालट करून ते नागरिकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी या उद्यानाला भेट देऊन तेथील सद्यस्थितीची सविस्तर पाहणी केली.

१७ सप्टेंबर २०२१ रोजी लोकार्पण झालेल्या या उद्यानाची दुरवस्था झाली असल्याने, त्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी व सद्यस्थिती पाहणी करण्यात आली. यावेळी महापौरांनी उद्यानातील विविध घटकांचा अभ्यास केला. पाहणी दरम्यान पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी महापौरांना उद्यानातील सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये विविध बाबींची अभ्यासपूर्ण पाहणी करण्यात आली.

जलव्यवस्थापन: उद्यानातील पाण्याची टाकी, पक्षांसाठीचे पाण्याचे पानवठे आणि झाडांना पाणी देण्यासाठी असलेली ड्रीप (ठिबक) सिस्टीम.

पायाभूत सुविधा: उद्यानात उपलब्ध असलेला जॉगिंग ट्रॅक आणि महापालिकेकडून पाणी पुरवठ्यासाठी करण्यात आलेली पाईपलाईन जोडणी.

वृक्षसंपदा: उद्यानात सद्यस्थितीत असलेली विविध प्रकारची झाडे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना.

हे उद्यान पर्यावरणप्रेमी विकासकांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने विकसित केले जाईल, जेणेकरून परिसरातील नागरिकांना, बालकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक उत्तम ठिकाण उपलब्ध होईल. जॉगिंग ट्रॅक देखील प्रस्तावित आहे.

या पाहणी दौऱ्यात महापौर दीपमाला काळे यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर, राजेंद्र नन्नवरे, चेतना नन्नवरे, सविता भोळे, अनिल भोळे, उमेश इंगळे, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी उद्यानाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत ते लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली, ज्यावर महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करा !
Tags: अटलबिहारी वाजपेयी उद्यानउद्यान पुनर्विकासजळगावदीपमाला काळेमहापौर पाहणीरायसोनी नगर
Previous Post

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’

Next Post

वादळी वारे, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पीक नुकसानीची नोंद करा – मंत्री रक्षा खडसे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वादळी वारे, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पीक नुकसानीची नोंद करा – मंत्री रक्षा खडसे

वादळी वारे, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पीक नुकसानीची नोंद करा – मंत्री रक्षा खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif