• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावातील बिस्मिल्ला चौकात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात

दारू पिण्यावरून वाद वाढला; दोन गटांमध्ये संघर्ष, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 19, 2026
in जळगाव, Uncategorized, क्राईम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव:जळगाव शहरातील तांबापूर परिसरातील बिस्मिल्ला चौकात बुधवारी उशिरा रात्री दगडफेकीची घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गानपुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इच्छादेवी चौक परिसरात दारू पिण्यावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन पुढे गवळीवाडा परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्यातून जोरदार दगडफेक झाली.

या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान पोलिसांवर कोणतीही दगडफेक झालेली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गानपुरे यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: एमआयडीसी पोलिसजळगावतांबापूरदगडफेकपोलिसबिस्मिल्ला चौक
Previous Post

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

Next Post

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif