• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 19, 2026
in जळगाव, Uncategorized
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर 19 जून रोजी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), जळगाव कार्यालयातर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या जैन हिल्समधील गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे उद्या दि. 19 ला संध्याकाळी 4 वाजेला विकसीत भारत या संकल्पनेतून पीएम-व्हीबीआरवाय ह्या योजनेतील विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना (डीबीटी) द्वारे हस्तांरीत केले जाणार आहे.

 

जळगाव येथील कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे प्रादेशिक कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यांच्यासोबत विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित उपस्थीत राहणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

 

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थीत असतील. पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित केले जाईल. या माध्यमातून देशभरातील 15 लाखांहून अधिक नागरिकांना अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे.

 

PM-VBRY ही रोजगारनिर्मितीला चालना देणारी केंद्र सरकारची रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना असून, प्रथमच संघटित क्षेत्रात रोजगार मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल ₹15 हजारांची मदत दिली जाते. तसेच अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते. देशभरात दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेसमोर ठेवण्यात आले आहे. पुणे क्षेत्रात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 75,711 कर्मचाऱ्यांना ₹42.79 कोटींपेक्षा अधिक लाभ, तर 6,351 नियोक्त्यांना ₹145.16 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे.

 

देशभरातील 200 ठिकाणी एकाचवेळी होणाऱ्या या कार्यक्रमात 9 हजार नियोक्ता प्रतिनिधी आणि 45 हजार कर्मचारी सहभागी होतील. कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मिती, रोजगाराला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षेचा विस्तार या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल, जैन हिल्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात जळगाव कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील प्रादेशिक परिसरातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ईपीएफओजळगावबातम्यानरेंद्रमोदींपीएमव्हीबीआरवायरोजगारयोजनाविकसितभारत
Previous Post

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

Next Post

AI मॉर्फ असलेला मंत्री गिरीश महाजनांचा फोटो प्रकरणी बदनामीचा गुन्हा दाखल!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
AI मॉर्फ असलेला मंत्री गिरीश महाजनांचा फोटो प्रकरणी बदनामीचा गुन्हा दाखल!

AI मॉर्फ असलेला मंत्री गिरीश महाजनांचा फोटो प्रकरणी बदनामीचा गुन्हा दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif