• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’

शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 8, 2026
in जळगाव, कृषी
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव– हवामान बदलासह मानवनिर्मित आपत्तींमुळे शेती ही न परवडणारी होत आहे, ही नकारात्मकता तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास बदलू शकते, मागील काही वर्षात शेतीमध्ये खूपच बदल झाले आहेत, यातून भारताचे विकसीत होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) हे आधुनिक कृषीक्षेत्राचे ‘पॉवर ऑफ हाऊस’ म्हणून पुढे येत आहे असा सुर उद्योजक प्रतिनिधी, शेतकरी व फाली मधील विद्यार्थी यांच्यात झालेल्या संवादात उमटला.

जैन हिल्स येथे फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया च्या १२ व्या वार्षिक अधिवेशनातील अंतिम टप्प्याची आज सुरवात झाली. शिवार फेरीत टिश्यूकल्चर रोपांचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी जैन हायटेक प्लॉन्ट फॅक्टरी, टिश्यूकल्चर लॅब, प्रक्रिया उद्योग समजण्यासाठी जैन फार्मफ्रेश फूडच्या कांदा निर्जीलकरण प्रकल्प, आंबा प्रक्रिया प्रकल्पा सह अन्य विभागांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्यात. यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘खोज गांधीजी की’ या ऑडिओ गाईडेड संग्राहलयातून महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात केले.

 

फोटो कॅप्शन – परिश्रम हॉलमध्ये गट चर्चेत सहभागी फालीचे विद्यार्थी, शेतकरी व कंपनी प्रतिनिधी 

 

भविष्यातील शेती म्हणजे माती विरहित शेती ‘फ्यूचर फार्मिंग’, हायड्रोपोनिक फार्मिक अनुभवली. यानंतर झालेल्या गट चर्चेत शेतकरी, उद्योजकीय प्रतिनिधींशी फालीच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला. परिश्रम व आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चेत शेतकरी नारायण पाचपांडे, उमाकांत भारंबे, सागर पाटील, पंकज घाटे, भागवत बाजीराव पाटील, विशाल पाटील, क्रिष्णा पाटील यांच्यासोबत विद्यार्थी गौरी त्रिपाठी, श्रृती चौहान, सिद्धी गावकर, शिवा देवसाकर, सेजल पाटील, प्राजक्ता भार्गव यांच्यासह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यात त्यांनी कार्बन क्रेडिट शेती, महिलांचे शेतीमधील योगदान, ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी बचत व खतांचा कार्यक्षमतेने वापर, टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून निर्यातक्षम उत्पादन, प्रक्रिया उद्योगवाढीसाठी लागणारे घटक, पोल्ट्रीउद्योग, ऑटोमेशन व आर्टिफेशियल तंत्रज्ञामुळे शेतीतील बदल, उत्पादन ते ट्रेडिंग पर्यंतची साखळी यासह नवनविन कृषी उद्योजकीय कल्पनांवर चर्चा करण्यात आली.

 

प्रश्नोत्तरातून फालीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीमधील बारकावे तसेच आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी लागणारे कौशल्य समजून घेतले. आकाश ग्राऊंड येथे झालेल्या शेतकरी संवादाचे सुत्रसंचालन जुली पटेल यांनी केले. तर परिश्रम हॉल येथे झालेल्या गट चर्चेचे समन्वयन शाबोर्नी पोद्दार यांनी केले.

बातमी शेअर करा !
Tags: आधुनिक शेतीजळगावजैन हिल्सफालीफाली१२अधिवेशनशेतकरी संवाद
Previous Post

शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेतीकडे वाटचाल करावी – पंडित अण्णा शिंदे 

Next Post

रायसोनी नगरातील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाची महापौरांकडून पाहणी!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रायसोनी नगरातील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाची महापौरांकडून पाहणी!

रायसोनी नगरातील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाची महापौरांकडून पाहणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 19, 2026

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

June 19, 2026

जळगावातील बिस्मिल्ला चौकात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात

June 19, 2026

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

June 19, 2026
महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif