नवराज्यLive न्यूज नेटवर्क
जळगाव – बदलत्या हवामानात जलसंवर्धन व आधुनिक सिंचन तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आधार शेतकरी जलदूत समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे यांनी केले ते केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालय आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘समृद्धी की पाठशाला’. या शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या उपक्रमात वाघूर डावा कालवा आसोदा-भादली परिसरातील शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली. एमसीएडी समृद्धी योजनेंतर्गत नशिराबाद येथे आयोजित या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जलसंधारण विभागाचे प्रकल्प संचालक अशोक जेएफ यांनी प्रेशरयुक्त पाइप सिंचन प्रणालीमुळे पाण्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होत असल्याचे सांगितले. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता गोकूळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ बी.डी. जडे तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी
आदी उपस्थित होते.
पाणी बचत व पाणी व्यवस्थापनाचे उपाय
उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर करून अधिक उत्पादन कसे घेता येईल, पाणी बचत व पाणी व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा असून, आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करता येते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांची प्रश्न उत्तर
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी. शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध होत नाही अशी व्यवस्था आहे का? असा प्रश्न केला. यावर तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन यांनी उत्तर देताना, प्रेशराईज सिस्टीमने पाणी उपलब्ध होईल यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करणे आवश्यक आहे असे सांगितले.
शेतकऱ्यांना चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली, तर पाठशाळेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तरातून तज्ज्ञांनी सांगितले.




