• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home उपक्रम

मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!

के. सी. ई. सोसायटी, जळगावचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शन; अॅड. प्रविणचंद्र जंगले यांच्या हस्ते संपन्न!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 6, 2026
in उपक्रम, जळगाव
मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : शहरातील हौशी गायक-गायिकांना आपली गायनकला सादर करण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या मनभावन कॅराओके क्लबचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रविणचंद्र जंगले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

के. सी. ई. सोसायटी, जळगावचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांच्या संकल्पनेतून मनभावन कॅराओके क्लबची स्थापना करण्यात आली आहे. जळगावातील हौशी गायक-गायिकांना आपली गायनकला सादर करण्यासाठी, कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी आणि संगीतप्रेमींना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी अॅड. प्रविणचंद्र जंगले यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी अशा व्यासपीठांची आवश्यकता असल्याचे सांगितले. कॅराओके क्लबच्या माध्यमातून नवोदित तसेच अनुभवी गायकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम. चे केंद्र संचालक अमोल यू. देशमुख यांनी सांगितले की, क्लबच्या माध्यमातून दर महिन्याच्या अखेरीस उत्कृष्ट गीताची निवड करण्यात येईल. निवडलेले गीत रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम.वर प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच रेडिओच्या डिजिटल माध्यमांद्वारे कलाकारांचा आवाज जगभरातील श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकाच क्षणात १५० हून अधिक देशांमधील श्रोत्यांपर्यंत आपली कला पोहोचविण्याची संधी या उपक्रमामुळे उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास तंत्रज्ञ हर्षल भाटिया, आर. जे. शुभांगी बडगुजर,सूचित्रा लोंढे ,साहिल गायकवाड ,प्रा.रविंद्रकुमार बावणे,जितेंद्र अग्रवाल,भागवत पाटील,राजेंद्र सराफ ,संजय कोरांणे यांच्यासह हौशी गायक, संगीतप्रेमी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. मनभावन कॅराओके क्लबच्या स्थापनेमुळे जळगावातील गायन क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळाले असून, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !
Tags: Kce सोसायटीकेसीईजळगावमनभावनरेडिओ एफ एम
Previous Post

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

Next Post

शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेतीकडे वाटचाल करावी – पंडित अण्णा शिंदे 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेतीकडे वाटचाल करावी – पंडित अण्णा शिंदे 

शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेतीकडे वाटचाल करावी - पंडित अण्णा शिंदे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif