• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज बालरोग तज्ञांच्या टीमचे यश!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 2, 2026
in आरोग्य, जळगाव
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : अमळनेर येथील अवघ्या तीन महिन्यांच्या बालिकेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचविले आहेत. गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर दाखल करण्यात आलेल्या या शिशुला दहा दिवसांच्या अथक उपचारांनंतर नवजीवन मिळाले असून सध्या तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.

याबाबत माहिती अशी की, अमळनेर येथील मोनीस हारून शेख यांच्या तीन महिन्यांच्या बालिकेला काही दिवसांपासून तीव्र ताप येत होता. त्यासोबतच तिला वारंवार झटके येण्यास सुरुवात झाली. प्रकृती बिघडत असल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने धुळे येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने आणि अधिक प्रगत उपचारांची आवश्यकता असल्याने तिला हायर सेंटर असलेल्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.

 

रुग्णालयात दाखल होताच एनआयसीयू व पीआयसीयू विभागातील तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर यांनी बालिकेची सखोल तपासणी सुरू केली. बालिकेच्या पाठीतील पाणी तपासणी, मेंदूचा एमआरआय तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांच्या आधारे बालिकेला ‘एनसेफेलायटीस’ (मेंदूची सूज) हा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. निदान स्पष्ट झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओमश्री गुडे, डॉ. कुशल धांडे, डॉ. विशाल कोठावडे, डॉ. नवेद खान, डॉ. मिमोनी कुंभारे, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनवणे, डॉ. भारती झोेपे या टीमने तत्काळ उपचार पद्धतीत बदल करून प्रतिबंधात्मक औषधांचा डोस वाढविला. बालरोगतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांनी सातत्याने बालिकेवर लक्ष ठेवत उपचार सुरू ठेवले. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत गेल्याने बालिकेची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. दहा दिवसांच्या उपचारांनंतर तिला व्हेंटीलेटरमधून बाहेर काढण्यात आले आणि अखेर तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आली.

विशेष म्हणजे या बालिकेवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागला नाही. गंभीर अवस्थेतील शिशुला वेळेवर योग्य निदान आणि अत्याधुनिक उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचविणे शक्य झाले. पीआयसीयू विभागातील हिरामण लांडगे यांनीही कागदपत्राच्या पूर्ततेसाठी सहकार्य केले.

 

बालिका आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. तिला ताप आणि झटक्यांसह श्वसनाचा त्रासही होता. आवश्यक तपासण्यांमधून एनसेफेलायटीसचे निदान झाल्यानंतर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. आमच्या एनआयसीयू व पीआयसीयू टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालिकेची प्रकृती सुधारली आणि तिला नवजीवन देता आले. लहान मुलांमध्ये तापासोबत झटके किंवा असामान्य लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

– डॉ. नवेद खान, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

 

बातमी शेअर करा !
Tags: Dr ulhas patilजळगावडॉ उल्हास पाटीलप्राणवाचले
Previous Post

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

Next Post

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन - अनिल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif