नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : श्री समस्त जळगाव बारी पंच व बारी समाज महिला मंडळातर्फे जळगाव जिल्ह्यातील बारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता दीपलक्ष्मी मंगल कार्यालय, घनश्याम नगर, खोटेनगर बस स्टॉपजवळ, जळगाव येथे होणार आहे.
यावेळी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सत्कारासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत किंवा स्पष्ट PDF प्रत दि. ३० जून २०२६ पर्यंत सादर करावी.
गुणपत्रिका महेंद्र बारी (स्वामी कॉम्प्युटर्स) यांच्या ९८५००७७६२३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा बारी समाजाच्या baripanchjal@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविता येईल. व्हॉट्सअॅपवर गुणपत्रिका पाठवल्यानंतर नोंदणी क्रमांक प्राप्त करण्यासाठी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास समाजबांधवांनी आपल्या पाल्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री समस्त जळगाव बारी पंच व बारी समाज महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे.







