• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अपघात

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू 

पिंपरूड फाट्याजवळील घटना ; चार जण जखमी 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 18, 2026
in अपघात, जिल्हा
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव :-येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे ( वय ४८, रा. रोझोदा, ह.मु. जळगाव) हे भुसावळ येथील लग्नकार्य आटोपून मूळगावी रोझोदा येथे जातांना फैजपूरनजीक १४ रोजी मध्यरात्री १.३० वा. यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी १५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात त्यांच्या परिवारातील पत्नी, मुलगी आणि आई हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे हे परिवारासह १३ मे रोजी भुसावळ येथे चुलत भावाच्या लग्नकार्यानिमीत्त एमएच १९ सीव्ही ०६२४ या वाहनाने गेले होते. गोरज मुहूर्ताचे लग्नकार्य आटोपून ते त्यांच्या मुळगावी रोझोदा येथे जाण्यासाठी निघाले असता पिंपरूड फाट्याजवळ त्यांची कार एका झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात प्रवीण कोल्हे हे गंभीररित्या जखमी झाले. तर परिवारातील त्यांची आई उषा प्रल्हाद कोल्हे (वय ६९), पत्नी हर्षा प्रवीण कोल्हे (वय ३८), मुलगी निर्मीती प्रवीण कोल्हे (वय १०) आणि वहीनी भावना नीलेश कोल्हे (वय ४१) हे जखमी झाले आहेत.

 

अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी १५ मे रोजी उपचारादरम्यान प्रवीण कोल्हे यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे गोदावरी परिवारावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. प्रवीण कोल्हे यांच्या अपघातील मृत्यूबद्दल माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलिसात नोंद घेण्यात आली असून फैैजपूर पोलीस ठाण्यात पंचनामा करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: अपघातगोदावरीदुःखाचे संकटपरिवाररजिस्टर
Previous Post

गिरीषभाऊ महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा उत्साहात जल्लोष

Next Post

हुलकावणीला अनलकी करत, लकी टेलर सभापती!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
हुलकावणीला अनलकी करत, लकी टेलर सभापती!

हुलकावणीला अनलकी करत, लकी टेलर सभापती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif