• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

हुलकावणीला अनलकी करत, लकी टेलर सभापती!

मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण व आ. राजूमामा भोळे यांची शिष्टाई

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 18, 2026
in जळगाव, निवडणूक, राजकारण
हुलकावणीला अनलकी करत, लकी टेलर सभापती!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव प्रतिनिधी :  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यापूर्वी दोन वेळा सभापतीपदाची संधी हुकल्यानंतर अखेर यंदा त्यांची वर्णी लागल्याने राजकीय वर्तुळात “लकी अखेर खरेच लकी ठरले” अशी चर्चा रंगली आहे.

जळगाव बाजार समितीत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही सभापतीपदाच्या निवडीदरम्यान मोठ्या राजकीय हालचाली घडत होत्या. काही महिन्यांपूर्वी शामकांत सोनवणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर सुनील महाजन यांची सभापतीपदी निवड करण्यात आली होती. मात्र अवघ्या सहा ते सात महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांच्या विरोधातही संचालकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आणि अविश्वास प्रस्तावाची तयारी सुरू झाली होती.

 

दरम्यान, संभाव्य राजकीय घडामोडी लक्षात घेता सुनील महाजन यांनी राजीनामा देत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार राजूमामा भोळे यांनी मध्यस्थी करत संचालकांशी संवाद साधला. त्यानंतर सभापती निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला.

 

सभापतीपदासाठी मनोज दयाराम चौधरी, मिलिंद चौधरी आणि लकी टेलर अशी तीन नावे चर्चेत होती. मात्र अखेरीस लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

 

निवड जाहीर होताच बाजार समिती परिसरात समर्थकांनी जल्लोष करत नूतन सभापतींचे स्वागत केले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह बाजार समितीचे संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार मंगेश चव्हाण यांनी आगामी काळात उर्वरित कार्यकाळात तीन सभापती आणि तीन उपसभापती बदल होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे बाजार समितीतील पुढील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कृषी उत्पन्न बाजार समितीजळगाव निवडणूकनिवडबिनविरोधलकी टेलरसभापती
Previous Post

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू 

Next Post

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; भाजप-शिवसेनेत उमेदवारीसाठी चुरस वाढली!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; भाजप-शिवसेनेत उमेदवारीसाठी चुरस वाढली!

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; भाजप-शिवसेनेत उमेदवारीसाठी चुरस वाढली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif