• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

गिरीषभाऊ महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा उत्साहात जल्लोष

शिरसाळे मारूती येथे महाआरती, नागरिकांना लाडू वाटप; विनोदभाऊ सोनवणे यांच्या सामाजिक कार्याचे गिरीषभाऊंकडून कौतुक

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 19, 2026
in Uncategorized, जळगाव, राजकारण
गिरीषभाऊ महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा उत्साहात जल्लोष
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

राज्याचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त योगराज फाऊंडेशन मुक्ताईनगरचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे तालुका नेते विनोदभाऊ सोनवणे यांच्या वतीने शिरसाळे मारूती, ता. बोदवड येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी नामदार गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते मारूती मंदिरात महाआरती करण्यात आली. वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांना लाडू वाटप करून उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

योगराज फाऊंडेशन मुक्ताईनगरचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुका नेते विनोदभाऊ सोनवणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक रुग्णांना उपचार, औषधे, अन्नधान्य तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात विनोदभाऊ सोनवणे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

शिरसाळे मारूती येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना नामदार गिरीषभाऊ महाजन यांनी विनोदभाऊ सोनवणे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य विनोदभाऊ सातत्याने करत आहेत. युवकांना दिशा देणे, गरजूंच्या पाठीशी उभे राहणे आणि विकासासाठी कार्यरत राहणे ही त्यांची कार्यपद्धती प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

तसेच मुक्ताईनगर व बोदवड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, तसेच विनोदभाऊ सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, गिरिषभाऊ महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात भव्य ६६ फुटांचे कटआऊट उभारण्यात आले असून, जळगाव शहराच्या इतिहासातील आजपर्यंतचे हे सर्वात मोठे कटआऊट ठरत आहे. कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि गिरिषभाऊंप्रती असलेले प्रेम याचे हे प्रतीक मानले जात आहे. हे भव्य कटआऊट नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: गिरीषभाऊमहाजनबोदवडभाजपामुक्ताईनगरयोगराज फाउंडेशनविनोदभाऊ सोनवणे
Previous Post

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

Next Post

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू 

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif