• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंदोलन

नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

पेपर लीक व परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात विद्यार्थ्यांचा संताप; निष्पक्ष चौकशीची अभाविपची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 16, 2026
in आंदोलन
नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !
नवराज्य Live न्यूज नेटवर्क

नीट-यूजी २०२६ परीक्षेमध्ये समोर आलेल्या अनियमितता, पेपर लीक व परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेतर्फे शहरातील काव्यरत्नावली चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये ११ वी-१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, नीटचे परीक्षार्थी तसेच अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “NTA जवाब दो”, “पेपर माफियांवर कठोर कारवाई करा” अशा घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. अभाविपने नेशनल नेशनल टेस्टिंग एजेंसीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

अभाविपने स्पष्ट केले की, २०२४ मध्ये अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतरही पुन्हा परीक्षा प्रक्रियेमध्ये अनियमितता होणे अत्यंत दुर्दैवी व निराशाजनक आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षेची तयारी करत असताना अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे.

यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही. पेपर लीक व परीक्षा घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी संयम राखावा, अफवांवर विश्वास ठेवू नये. अभाविप प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्यायासाठी ठामपणे लढत राहील.”

अभाविप जळगाव महानगर मंत्री वरद पांढारकर यांनी सांगितले की, “नीट परीक्षा व्यवस्थेतील वारंवार समोर येणाऱ्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी अभाविप रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.”

यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे,जळगांव महानगर सहमंत्री वरद पांढारकर, ललित सोनार, गणेश दुसाने, मोहित सोनी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अभाविप जळगावएनटीए निषेधनीट पेपर लीकनीट-यूजी २०२६परीक्षा घोटाळाविद्यार्थी आंदोलन
Previous Post

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया.

Next Post

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कामगारांसाठी रुमाल वाटप!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कामगारांसाठी रुमाल वाटप!

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कामगारांसाठी रुमाल वाटप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif