• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया.

वार्षिक सभेत अशोक जैन यांनी केली घोषणा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 14, 2026
in जळगाव, यश निवड, सामाजिक
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव दि.१२ प्रतिनिधी : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ, जळगाव यांच्या वार्षिक सभेचे आयोजन दि. १० मे २०२६ रोजी जैन हिल्स येथे करण्यात आले होते. सभेची सुरुवात शासनपती भगवान महावीर स्वामीजी, प. पू. आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा., वर्तमान आचार्य शिवमुनिजी म. सा. तसेच युवाचार्य प्रवर प .पू. महेंद्रऋषीजी म. सा. यांना वंदन करून आणि सामूहिक नवकार महामंत्र पठणाने झाली.

सभेच्या प्रारंभी देवलोकगमन झालेल्या महासाध्वी वाणीभूषण प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. तसेच महासाध्वी प.पू. पद्मश्री डॉ. चंदनाजी म.सा. यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. सभामंचावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, तारादेवी रेदासनी, ताराबाई डाकलिया, ज्योती अशोक जैन, दिलीप चोपडा, अनिल कोठारी, शांतीलाल बिनायक्या, नंदलाल गादिया उपस्थित होते. सभेत नवीन अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने संध्या अश्विन कांकरिया यांची अध्यक्षा म्हणून निवड केली.

कार्यकारिणीत शांतीलाल बिनायक्या, नगरसेवक अमर जैन, संजीव मेहर, नंदलाल गादिया, सुनील ललवाणी, संदीप रेदासनी, रूपेश लुंकड, प्रवीण पगारिया, राजेंद्र पारख, दिनेश डाकलिया, अतुल जैन, महेंद्र लोढा, जितेंद्र जांगडा, नरेंद्र सांडेचा, नरेंद्र कोठारी, दिनेश बोरा, नरेंद्र बंब, अजित कोठारी, सुनीता डाकलिया, डॉ. सोनाली जैन, सीए तेजल संघवी, तृप्ती रायसोनी, संगीता पारख, स्वीटी देसर्डा, अनिता कांकरिया, प्रदीप श्रीश्रीमाळ, बाबूशेठ श्रीश्रीमाळ, प्रवीण धाडीवाल, अनिल सिसोदिया, प्रियेश छाजेड यांचा समावेश आहे. संध्या कांकरिया यांनी मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा सांगत अशोक जैन, प्रदीप रायसोनी यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रमण संघाच्या नियमावलीचे वाचन दिलीप चोपडा यांनी केले. विभाग प्रमुखांच्या कार्याची माहिती, भविष्यातील रणनीती याविषयी रमण छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले. श्रमण संघ सदस्य डायरेक्टरीबाबतची माहिती जितेंद्र कोठारी यांनी माहिती केली.

संघटनात्मक एकता महत्त्वाची – अशोक जैन

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अशोक जैन म्हणाले की, समाजातील सर्व सदस्यांनी एकजुटीने धर्मसेवा, संतसेवा आणि संघसेवेसाठी सदैव पुढाकार घेतला पाहिजे. पदाची अपेक्षा न ठेवता समर्पणभावाने सेवा करणे आवश्यक आहे. मागील कार्यकाळातील उपक्रमांकडे पाहिले असता एकतेच्या बळावर किती सुंदर कार्य घडू शकते, हे स्पष्ट होते. ही संघटनात्मक एकता कायम राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. “संघ, समाज, संप्रदाय, गच्छ आणि संतवृंदांविषयी बेजबाबदार वक्तव्य करू नये. सार्वजनिकरित्या कोणी असे करत असल्यास त्याला त्याच ठिकाणी रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तेच खरे संघहित आणि संघसेवा ठरेल.”

बातमी शेअर करा !
Tags: अशोक जैनकार्यकारणीजैनश्रमण संघश्रीवर्धमानस्थानक वासी
Previous Post

जळगाव जनता सहकारी बँकेच्या ‘नेट बँकिंग’ सेवेचा शुभारंभ!

Next Post

नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif