• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पीडब्ल्यूडीत लाचखोरीचा सापळा; शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जेरबंद

थकीत बिल मंजुरीसाठी १५ लाखांची मागणी; पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीची धडक कारवाई

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 9, 2026
in क्राईम, जळगाव
पीडब्ल्यूडीत लाचखोरीचा सापळा; शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जेरबंद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला असून, मक्तेदाराचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी लाखोंची लाच मागणाऱ्या शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. योगेश अहिरे असे अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव असून, १५ लाख रुपयांच्या मागणीपैकी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

माहितीनुसार, तक्रारदार मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण केलेल्या कामाचे बिल मंजुरीसाठी सादर केले होते. मात्र, संबंधित बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी तब्बल १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाचेची रक्कम देण्यास नकार देत मक्तेदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर ठरलेली ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश अहिरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने उचललेल्या कठोर पावलाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, लाचेच्या व्यवहारामागे मोठे रॅकेट कार्यरत होते का, याचा तपास एसीबीकडून सुरू करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या आर्थिक व्यवहारांसह संपत्तीचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: Acbजळगावभ्रष्टाचारमहाराष्ट्र न्यूजयोगेश अहिरेसार्वजनिक बांधकाम
Previous Post

का.उ. कोल्हे विद्यालयाचा दहावीच्या निकालात झेंडा!

Next Post

दीपस्तंभ फाऊंडेशन- मनोबलची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा येत्या ५ आणि २१ जुनला राष्ट्रीय स्तरावर होणार*

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

दीपस्तंभ फाऊंडेशन- मनोबलची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा येत्या ५ आणि २१ जुनला राष्ट्रीय स्तरावर होणार*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif